Sun, Jul 21, 2019 10:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महाराष्ट्राच्या दोन्ही संघाची विजयी सलामी

महाराष्ट्राच्या दोन्ही संघाची विजयी सलामी

Published On: Feb 10 2018 2:17AM | Last Updated: Feb 10 2018 1:08AMमुंबई : क्रीडा प्रतिनिधी 

   महाराष्ट्राच्या कोमल देवकरने एकाच चढाईत चार गडी टिपले. महाराष्ट्राच्या पुरुष व महिला संघांनी तीसर्‍या फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी दिली. भारतीय कबड्डी महासंघ व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या यजमानपदाखाली आजपासून जोगेश्वरी येथील एसआरपी ग्राऊंडवर शुक्रवार पासून सुरू झालेल्या महिलांच्या ब गटातील उद्घाटनिय साखळी सामन्यात महाराष्ट्राने केरळ संघावर 47-21  अशी मात करीत विजयी सलामी दिली. मध्यांतराला 17-10 अशी आघाडी घेणार्‍या महाराष्ट्राने नंतर मात्र जोरदार खेळ करीत हा मोठया फरकाने विजय मिळविला.

कोमल देवकर, सायली केरीपाळे यांच्या चढाया तर अभिलाषा म्हात्रेच्या भक्कम पकडी यामुळे हा विजय मिळवला. कोमलने 5 चढायात 8 गुण मिळविले. सायली केरीपालेने 10 चढायात 8 गुण मिळविले. अभिलाषाने 4 पकडी यशस्वी केल्या. महाराष्ट्राने एकूण 3 लोण दिले. केरळ कडून विद्याने 9 चढाया 2 बोनस व 2 गुण असे एकूण 4 गुण मिळविले. पुरुषांच्या अ गटात महाराष्ट्राने उत्तर प्रदेशाला 34-33 असे चकविले. मध्यांतराला 20-16 अशी आघाडी घेणार्‍या महाराष्ट्राला नंतर मात्र यूपीने चांगलेच झुंजवले. महाराष्ट्राकडून रिशांक देवाडीगाने 22 चढायात 1बोनस व 8 गुण मिळविले. दोन वेळा त्याची पकड झाली.