Wed, Jul 17, 2019 10:03होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी शिक्षा भोगणाऱ्या ताहीर मर्चंटचा मृत्यू

मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी शिक्षा भोगणाऱ्या ताहीर मर्चंटचा मृत्यू

Published On: Apr 18 2018 1:21PM | Last Updated: Apr 18 2018 1:21PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी पुण्यातील येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या ताहीर मर्चंट याचा आज पहाटे मृत्यू झाला. मध्यरात्री छातीत दुखायला लागल्याने त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

१९९३ मध्ये मुंबईत स्फोट घडवून आणण्यात त्याचा सहभाग होता. तसेच शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणासाठी मुंबईतून तरुणांना पाकिस्तानात पाठवल्याचाही आरोप त्याच्यावर होता. कट रचल्याप्रकरणी ताहीर मर्चंटला दोषी धरले होते. सर्वोच्च न्यायालयाने मर्चंटच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली होती. त्यानंतर तो जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. 

१९९३ मध्ये झालेल्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी ताहीरला विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्याच्यासोबत फिरोज खान यालाही शिक्षा सुनावली होती.  या आधी आर्थर रोड कारागृहात डॉन मुश्तफा डोसा याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.

Tags :Mumbai, Bomb, blast, 1993, prison,  Tahir Merchant, died,