Wed, Jul 24, 2019 12:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई-अहमदाबाद मार्ग जाम; वाहनांच्या रांगा

मुंबई-अहमदाबाद मार्ग जाम; वाहनांच्या रांगा

Published On: Dec 24 2017 1:45AM | Last Updated: Dec 24 2017 12:59AM

बुकमार्क करा

वसई : प्रतिनिधी

सलग तीन दिवस रजा मिळाल्याने चाकरमानी आपल्या कुटुंबियांसह विविध ठिकाणी सहलीसाठी निघाल्याने शनिवारी सकाळी मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्र.8 वर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. यामुळे घोडबंदर ते थेट नायगाव-ससुनवघरपर्यर्ंत वाहनाच्या रांगा लागल्या. चौथा शनिवार, रविवार व नाताळ अशा सलग सुट्या मिळाल्यामुळे चाकरमान्यांनी सहलीचे बेत आखले. त्यामुळे दररोजपेक्षा अधिक वाहने रस्त्यावर आली व वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला. घोडबंदर पूल ते नायगाव, खानिवडे ते वसई दरम्यान हजारो वाहने या कोंडीत सापडली. त्यामुळे गुजरातच्या दिशेने जाणार्‍या वाहनांना 4 कि.मी. चे अंतर कापण्यासाठी अडीच तासांचा अवधी लागत होता.