होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन सुसाट

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन सुसाट

Published On: Feb 02 2018 2:01AM | Last Updated: Feb 02 2018 1:50AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनला राज्यात विरोधक आणि सत्तेत सामील असलेल्या शिवसेनेकडूनही विरोध होत केंद्र सरकारने या प्रकल्पाला गती देण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पासाठी गुजरातमधील बडोद्यात स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणाही करण्यात आली आहे. देशात हायस्पीड रेल्वे कॉरीडॉरसाठी येथे प्रशिक्षणाची व्यवस्था केली जाणार आहे. 

सुमारे 1 लाख कोटी रुपये खर्चून मुंबई अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेन धावणार असून या प्रकल्पाचे भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच मुंबईत केले होते. या प्रकल्पासाठी जपान सरकारने अर्थसहाय्य दिले आहे. बांद्रा कुर्ला संकुलातून ही बुलेट ट्रेन अहमदाबादसाठी सुटेल. मात्र, हा प्रकल्प म्हणजे मुंबईचे महत्व कमी करण्याचा डाव असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या प्रकल्पाचा कोणताही फायदा महाराष्ट्राला होणार नसून गुजरातमधील व्यापार्‍यांसाठी ही ट्रेन लाभदायी ठरणार आहे. अहमदाबाद येथे आर्थिक केंद्राला मंजुरी दिली असून या आर्थिक केंद्राला बुलेट ट्रेनने बळकटी देण्यासाठी ही योजना आणल्याचाही विरोधकांसह शिवसेनेचाही आरोप आहे. बजेटमधून मात्र या प्रकल्पाला गती देण्याचा संकल्प आहे. या प्रकल्पासाठी बडोद्यात स्वतंत्र विद्यापिठ स्थापन केले जाणार आहे. या विद्यापिठात बुलेट ट्रेनप्रमाणे देशातील हायस्पीड रेल्वेसाठी प्रशिक्षीत मनुष्यबळ तयार करण्यात येणार आहे.