होमपेज › Mumbai-Thane-Raigad › धक्कादायक; मुंबईत IPL दरम्यान तरूणीचा विनयभंग

मुंबईत IPL दरम्यान तरूणीचा विनयभंग

Published On: Apr 16 2018 10:30AM | Last Updated: Apr 16 2018 10:53AMमुंबई : प्रतिनिधी

आयपीएल स्पर्धेतील मुंबई इंडियन्स संघाचा सामना बघण्यासाठी शनिवारी वानखेडे स्टेडियमवर  गेलेल्या 22 वर्षीय तरुणीला पाणी देण्याच्या बहाण्याने एका तरुणाने तिचा विनयभंग केल्याची  धक्कादायक घटना घडली. त्याच्या तावडीतून स्वत ची सुटका करुन घेत, विद्यार्थिनीने  पळ काढल्यानंतर ही धक्कादायक बाब लक्षात येताच बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी या  माथेफिरु तरुणाला ताब्यात घेतले. या घटनेमुळे  स्टेडियममध्ये एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल करुन मरीन ड्राईव्ह  पोलिसांनी या आरोपी तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेली 22 वर्षीय तरुणी शनिवारी तिच्या मैत्रिणींसोबत वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सचा सामना बघण्यासाठी आली होती. सामना संपल्यानंतर रात्री सव्वा आठच्या सुमारास ती स्टेडियममधून बाहेर पडत होती. ही तरुणी सचिन तेंडुलकर स्टँडजवळ असताना पाणी देण्याच्या बहाण्याने जनराज सतनामी (26) या तरुणाने तिच्याजवळ जात लगट करण्याचा प्रयत्न केला. तरुणीने खडसावताच तो तेथून मागे हटला. मात्र तरुणी तेथून निघताच त्याने तिचा पाठलाग सुरू केला.सतनामी याने पाठीमागून येत तरुणीसोबत अश्‍लिल चाळे करण्यास सुरुवात केली. अखेर तरुणीने पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करुन सतनामी याला ताब्यात घेत, मरिन ड्राईव्ह पोलिसांच्या हवाली केले.
 

Tags : Mumbai, Wankhede Stedium, Molested, IPL Match, Accused, Arrested