Sat, Aug 17, 2019 16:57होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईच्या गगनचुंबी इमारतीत १५६८ आगीच्या दुर्घटना!

मुंबईच्या गगनचुंबी इमारतीत १५६८ आगीच्या दुर्घटना!

Published On: Sep 04 2018 5:11PM | Last Updated: Sep 04 2018 5:11PMमुंबई  : प्रतिनिधी 

मुंबईत गगनचुंबी इमारतीचे जाळे पसरले आहे. मुंबई भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते आणि मुंबईला सर्वात जास्त सुरक्षित शहर मानले जाते. परंतु गेल्‍या काही वर्षात घडलेल्‍या घटनांमुळे मुंबई हे अपघातांचे शहर बनले आहे. कारण दहा वर्षात मुंबईत तब्बल . 48434 आग लागण्याच्या घटना घडल्‍याची माहिती आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांना मुंबई अग्निशमन दलाने दिली आहे. 

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई अग्निशमन दलाकडे 2008 पासून 2018 पर्यंत मुंबईत आगीच्या किती घटना घडल्‍या आहेत, तसेच गगनचुंबी इमारतामधील/ रहिवाशी इमारतीत / व्यावसायिक इमारतीत आणि झोपड्यांमध्ये आतापर्यंत किती आग लागल्‍याच्या घटना घडल्‍या आहेत. कोणत्या कारणामुळे आग लागली आहे. आणि आगीच्या दुर्घटनेत किती लोकांचा मृत्यू झाला आहे, तसेच किती रुपयांच्या मालमत्तेच्या नुकसान झाले आहे. याबाबत माहिती विचारली होती. सदर माहिती संदर्भात मुंबई अग्निशमन दलाचे जनमाहिती अधिकारी तथा विभागीय अग्निशमन अधिकारी एस.डी. सावंत यांनी शकील अहमद शेख यांस माहिती अधिकार अधिनियम-2005 अन्वये माहिती दिलेली आहे. माहितीप्रमाणे सन 2008 पासून जुलै 2018 पर्यंत एकूण 48434 आग लागण्याच्या दुर्घटना झाल्या आहे. त्यात 1568 गगनचुंबी इमारतीत आग लागली आहे यामध्ये 8737 रहिवाशी इमारतीत आग लागली आहे. तसेच 3833 व्यासायिक इमारतीत आग लागली आहे. आणि 3151 झोपडपाट्यामध्ये आगीच्या घटना घडल्‍या आहेत. सर्वात जास्त तब्बल 32516 आगीच्या घटनांमध्ये आग लागण्याचे कारण शोर्टसर्किट आहे.  तब्बल 1116 प्रकरणात आग ही गॅस सिलिंडर लिकेजमुळे लागली  आहे. तर तब्बल 11889 प्रकरणात आग अन्य कारणामुळे लागली आहे. तसेच एकूण 609 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यात  212 पुरुष व  212 स्त्री  आणि 29 मुलांचा समावेश आहे. तसेच आगीच्या घटनेत 890486102/- रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. 

तसेच परिमंडळ-I च्या हद्दीत एकूण 9887 ठिकाणी आगी लागल्‍या आसून, त्यात 325 गगनचुंबी इमारत, 1546 रहिवाशी इमारत, 987 व्यावसायिक इमारत आणि 75 झोपड्यांमध्ये लागलेल्‍या आगीच्या घटनांचा समावेश आहे. तसेच परिमंडळ-II च्या हद्दीत सर्वात जास्त एकूण  10719 ठिकानी  आग लागली असून त्यात 129 गगनचुंबी इमारती, 1824 रहिवाशी इमारती, 664 व्यावसायिक इमारती आणि 934 झोपड्यात घटनेच्या समावेश आहे.  तसेच परिमंडळ-III चे हद्दीत एकूण 8717 आग लागली असून, त्यात 496 गगनचुंबी इमारत, 1382 रहिवाशी इमारत, 939 व्यावसायिक इमारत आणि 443 झोपड्यातील घटनांचा समावेश आहे. तसेच परिमंडळ-IV चे  हद्दीत एकूण 8328 आगी लागल्‍या असून, त्यात 289 गगनचुंबी इमारत, 1835 रहिवाशी इमारत, 661 व्यावसायिक इमारत आणि 403 झोपड्यातील घटनांचा समावेश आहे. तसेच परिमंडळ-V चे हद्दीत एकूण 5683 आगी लागल्‍या असून, त्यात 50 गगनचुंबी इमारत, 1547 रहिवाशी इमारत, 208 व्यावसायिक इमारत आणि 1273 झोपड्यातील घटनांचा समावेश आहे.  तसेच परिमंडळ-VI चे हद्दीत एकूण 5107 आगीच्या घटना घडल्‍या असून त्यात 279 गगनचुंबी इमारत, 603  रहिवाशी इमारत, 374 व्यावसायिक इमारत आणि 23 झोपड्यांचा समावेश आहे.  

सर्वात जास्त गगनचुंबी इमारतीत परिमंडळ-III च्या हद्दीत एकूण 496 आगीच्या घटना घडल्या आहे. तसेच सर्वात जास्त रहिवाशी इमारतीत परिमंडळ-IV च्या हद्दीत 1835 इतक्या आगीच्या घटना घडल्या आहे. तसेच सर्वात जास्त व्यावसायिक  इमारतीत परिमंडळ-I च्या हद्दीत 987 इतक्या आगीच्या घटना घडल्या आहे. तसेच सर्वात जास्त झोपड्यात परिमंडळ-V च्या हद्दीत 1273 इतक्या आगीच्या घटना घडल्या आहे. तसेच सर्वात जास्त एकूण 177 लोकांचा बळी परिमंडळ-I च्या हद्दीत झाला आहे. तसेच सर्वात जास्त आगीच्या घटनेत नुकसान एकूण 394809686/- इतके रुपयांच्या नुकसान झाले आहे.

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांच्या मते मुंबई अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन दल अधिकारी महाराष्ट्र अग्निप्रतिबंधक व जीवरक्षक उपाययोजना अधिनियम -2006 ची अंमलबजावणी का करत नाही ? अजूनही आग दुर्घटनेची वाट पाहत आहे का? यासंदर्भात शकील अहमद शेख यांनी मुंबई मनपा आयुक्त अजॉय मेहता आणि मुख्य अग्निशमन अधिकारी प्रभात रहांगदले यांस पत्र पाठवून महाराष्ट्र अग्निप्रतिबंधक व जीवरक्षक उपाययोजना अधिनिय-2006 ची अमलबजावणी करण्याची मागणी केली आहे.