Thu, Apr 25, 2019 13:43होमपेज › Mumbai-Thane-Raigad › निर्देशांकाचा नवा विक्रम; निफ्टीही ११ हजारच्या पुढे 

निर्देशांकाचा नवा विक्रम; निफ्टीही ११ हजारच्या पुढे 

Published On: Jan 24 2018 1:39PM | Last Updated: Jan 24 2018 1:39PMमुंबई: पुढारी ऑनलाईन

मुंबई शेअर बाजारात मंगळवारी झालेली ३६ हजार अंशांची ऐतिहासिक नोंद मोडीत काढत बुधवारी सेन्सेक्सने ३६ हजार २६८.१९ अंकांची पातळी गाठली. तर राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात निफ्टी देखील ११ हजार ११०.१० अंकांवर पोहोचला. आज बाजाराची सुरुवात संथगतीने झाली. मात्र, बँकिंग, आयटी, एफएमसीजी, फार्मा आणि रियल्टी इंडेक्सच्या शेअर खरेदीनंतर बाजाराने उसळी घेतली. 

दरम्‍यान, मंगळवारी पहिल्‍यांदाच सेन्सेक्‍सने ३६ हजारांचा टप्पा गाठला होता. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनेही ११ हजारांची विक्रमी पातळी पहिल्यांदाच गाठली. मंगळवारी सकाळी व्यवहार सुरू होताच एकाच मिनिटात निफ्टीने विक्रमी टप्पा गाठला होता. पाठोपाठ निर्देशांकानेही 36 हजार पार केले. सार्वजनिक क्षेत्रातील बँका, माहिती-तंत्रज्ञान आणि औषध उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरमुळे निर्देशांकाने ऐतिहासिक टप्पा पार केला. निर्देशांक 341.97 अंशांच्या वाढीसह 36 हजार 129 वर, तर निफ्टी 117.50 अंशांच्या वाढीसह 11 हजार 083.70 वर बंद झाला. फक्त सहा दिवसांत निर्देशांकाने 35 ते 36 हजारांचा टप्पा पार केला आहे.