Tue, Apr 23, 2019 05:47होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वृक्षतोडीमुळे मुंबई भकास होईल  आणि फक्त मेट्रोच शिल्लक राहील

वृक्षतोडीमुळे मुंबई भकास होईल  आणि फक्त मेट्रोच शिल्लक राहील

Published On: Feb 16 2018 2:36AM | Last Updated: Feb 16 2018 1:41AMमुंबई : प्रतिनिधी

विकासाच्या नावाखाली मेट्रोसाठी होत असलेली वृक्षतोड पहाता भविष्यात मुंबई भकास होईल. तिचे अस्तीत्वच नष्ट होईल आणि केवळ मेट्रोच शिल्लक राहील, अशी भीती उच्च न्यायालयाने व्यक्त केली. तसेच मेट्रो 3 च्या कारशेडमुळे आरे कॉलनीमधील जंगल नष्ट होणार नसल्याचा दावा करणार्‍या राज्य सरकार आणि मेट्रो रेल प्राधीकरणाला  न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाने चांगलेच धारेवर धरले. मेट्रोच्या नावाखाली शहरात होणारी वृक्षतोड ही गंभीर बाब आहे . त्याबाबत राज्य सरकार आणि मेट्रोची नेमकी काय भुमीका आहे हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे, असे स्पष्ट करून याचिकोची सुनावणी 1 मार्च रोजी निश्‍चित केली.

आरे कॉलनी येथील मेंट्रो 3 च्या कारशेडसाठी होणारी वृक्षतोड पहाता या परिसरात जंगल नष्ट होण्याची भीती व्यक्त करून ही कारशेड कांजूरमार्ग येथे हलविण्याचा आदेश द्या, अशी विनंती करणारी जनहित याचिका अमृता भट्टाचार यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. गुरुवारी ही याचिका न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाच्या निदर्शनास आली. या प्रस्तावित कारशेडच्या उभारणीच्या कामादरम्यान मोठमोठ्या मशनरी आणल्या जात आहेत. या परीसरात सिमेंट प्लांट उभारले जाण्याबरोबरचे अन्य कामामुळे या भागाचे नुकसान होऊन जंगल नष्ट होणार असल्याचा दावा केला.