Sat, Jul 20, 2019 15:46होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भारताचा ‘लादेन ’ अब्दुल कुरेशी गजाआड

भारताचा ‘लादेन ’ अब्दुल कुरेशी गजाआड

Published On: Jan 23 2018 1:59AM | Last Updated: Jan 23 2018 1:54AMमुंबई/दिल्‍ली : पुढारी वृत्तसेवा

इंडियन मुजाहिद्दीन (आयएम) या दहशतवादी संघटनेचा संस्थापक सदस्य आणि स्टुडंट इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडियाचा (सीमी) दहशतवादी अब्दुल सुभान कुरेशी याने राजधानी दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर आखलेला घातपाताचा कट उधळवून लावत त्याच्या मुसक्या आवळण्यात दिल्ली पोलिसांना यश आले आहे. व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनीअर असलेला कुरेशी बॉम्ब बनवण्यात तरबेज आहे. मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटासोबत अहमदाबाद, जयपूर यासारख्या अनेक स्फोटांमध्ये त्याचा हात असून भारताचा ओसामा बीन लादेन म्हणून तो कुविख्यात होता.
दिल्लीतील जामा मशिद परिसरात तीन संशयित दहशतवादी लपले असून ते प्रजासत्ताक दिनी घातपात घडवण्याची शक्यता आहे.

काश्मीरच्या पुलवामामधून त्यांना विविध प्रकारच्या सूचना दिल्या जात असून याबाबत गुप्तचर विभागाकडून हायअ‍ॅलर्ट जारी करण्यात आला होता. राजधानीमध्ये घातपात घडवून आणण्यासाठी काही दहशतवादी घुसले असल्याची माहिती गुप्तचर विभागाकडून मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी छापेमारी सुरू केली होती. या छापेमारीदरम्यान गुजरातमधील साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड अब्दुल कुरेशी दिल्लीत लपल्याची महत्वपूर्ण माहिती पोलिसांच्या हाती लागली. याच माहितीच्या आधारे, एका कारमधून येत असलेल्या कुरेशी याला दिल्लीच्या गाझीपूर सीमेवर एका विशेष पथकाने दोन दिवसांपूर्वी सापळा रचून अटक केल्याचे दिल्लीचे पोलीस उपायुक्त प्रमोद कुशवाहा यांनी सांगितले. कुरेशीकडून एक पिस्तूल जप्त करण्यात आले असून न्यायालयाने कुरेशी याला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून त्याची कसून चौकशी सुरू असल्याचे पोलीस उपायुक्त कुशवाह यांनी स्पष्ट केले. 

  व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनीअर असलेला कुरेशी हा बॉम्ब बनवण्यात माहीर आहे. 
  2008 साली गुजरात आणि दिल्लीत घडविण्यात आलेल्या बॉम्बस्फोटातही तो सहभागी होता. 
 मुंबई साखळी बॉम्बस्फोट, अहमदाबाद, जयपूर यांसारख्या अनेक स्फोटांमध्ये त्याचा हात होता.
 तत्कालीन गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या काळात जाहीर करण्यात आलेल्या 50 वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीमध्ये कुरेशी याच्या नावाचाही समावेश होता. गुप्तचर यंत्रणांच्या रडारवर असलेला कुरेशी हा काही दिवसांपूर्वी सौदीला पळून गेल्याची माहिती समोर आली होती.
   गेल्या दशकभरापासून गुप्तचर यंत्रणा, तपास यंत्रणा आणि पोलिसांना गुंगारा देत लपून बसलेला कुरेशी हा इंडियन मुजाहिद्दीनच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहे. सिमी या दहशतवादी संघटनेशीही त्याचे संबंध आहेत.

दिल्लीच्या गाझीपूर सीमेवरुन दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केलेला दहशतवादी अब्दुल सुभान कुरेशी याचे मुंबईशी थेट कनेक्शन होते. नवी मुंबईत तो शिकला. मुंबईतच नोकरीलाही लागला आणि मिळालेली नोकरी सोडून याच मुंबईत तो आधी सीमी आणि नंतर इंडियन मुजाहिदीनसाठी अतिरेकी कारवाया करू लागला.  माय 3