Thu, Apr 18, 2019 16:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › "मी इंचभरही जागा देणार नाही; कुणीही माझ्याकडे येऊ नका"

"मी इंचभरही जागा देणार नाही; कुणीही माझ्याकडे येऊ नका"

Published On: Jan 11 2018 6:31PM | Last Updated: Jan 11 2018 6:36PM

बुकमार्क करा
मुंबई: वृत्तसंस्था 

उच्चभ्रु दक्षिण मुंबईत घर घेण्यासाठी जागा मागणार्‍या नौदलाला केंद्रीय परिवहन आणि बंदर विकास मंत्री नितीन गडकरी यांनी कडक शब्दात फटकारले आहे. ‘दहशतवादी प्रवेश करू शकतात अशा ठिकाणी नौदलाने राहणे अपेक्षित आहे. मग सगळेच दक्षिण मुंबईत राहण्याची धडपड का करतात? नौदलातील अनेक जण माझ्याकडे जमिनीची मागणी करण्यासाठी येतात. मी इंचभरही जागा देणार नाही. परत कुणीही माझ्याकडे येऊ नका.

अशा शब्दात गडकरी यांनी फटकारले आहे. ‘दक्षिण मुंबईतील मोक्याच्या जमिनीवर सगळयांना क्‍वार्टस किंवा फ्लॉट बांधायचे आहेत. आम्ही नौदलाचा सन्मान करतो. पण तुम्ही पाक सीमेवर जाऊन देखरेख करा’ असेही गडकरी यांनी सुनावले आहे. 

विशेष म्हणजे वेस्टर्न नेव्हल कमांडचे प्रमुख व्हाईस अ‍ॅडमिरल गिरीश लुथरा यांच्या उपस्थित एका जाहीर कार्यक्रमात गडकरींनी यांनी नौदलला सुनावले.  दक्षिण मुंबईतील मलबारहिल भागात तरंगत्या जेट्टी उभारण्यास नौदलाने परवानगी नाकारल्याच्या पार्श्‍वभूमीवर गडकरी यांनी ही नाराजी व्यक्‍त केली आहे. पूर्वेकडील समुद्र किनार्‍यावर जमिन स्थानिक लोकांच्या फायद्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि महाराष्ट्र शासनातर्फे विकसित केली जात आहे असे देखील त्यांनी स्पष्ट केले. 

दक्षिण मुंबईत नौदलाच्या वेस्टर्न कमांडचे मुख्यलय असून अनेक महत्त्वाच्या अधिकार्‍यांची घरे त्याठिकाणी आहेत. याशिवाय कुलाब्यातील नेवी नगरमध्येही नौदलासाठी क्‍वाटर्स आहेत. 

विकास कामात अडथळे आणू नका

मलबार हिल भागात फ्लोटिंग जेट्टी उभारण्याबाबत नौदलाच्या असलेल्या विरोधाचाही गडकरी यांनी समाचार घेतला. ‘मलबारहिल परिसरात नौदलचा काय संबंध असा सवाल करून गडकरी म्हणाले, ‘हे खाजगी निवास क्षेत्र असून, त्याठिकानी महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री यांची निवासस्थाने आहेत. याठिकाणी नौदलाचे काहीच काम नाही. हे प्रकरणी चर्चा करण्यासाठीही त्यांनी नौदलाला आमंत्रित करतांना विकास कामात अडथळे आणू नका अशा इशाराही दिला आहे.  पायाभूत सुविधांचे जास्तीत जास्त प्रकल्प वेळेत मार्गी लावण्यावर आमच्या मंत्रालयाचा भर असतो. नौदल आणि लष्करी मंत्रालय म्हणजे सरकार नाही. आम्ही सरकार आहोत असेही गडकरी म्हणाले.