Tue, Jul 23, 2019 07:19होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रिलायन्सची वार्षिक सर्वसाधारण सभा; जिओबद्दल महत्त्वाची घोषणा

रिलायन्सचा गीगा टीव्ही, ब्रॉडबँड आणि बरंच काही...

Published On: Jul 05 2018 11:21AM | Last Updated: Jul 05 2018 12:03PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

रिलायन्स उद्योग समुहाची ४१वी वार्षिक सर्वसाधारण वार्ष्‍कि सभा सुरु झाली. रिलायन्स उद्योगसमुहाचे चेअरमन मुकेश अंबानी या सभेत जिओबद्दल मोठी घोषणा केली आहे. यापूर्वी झालेल्या वार्षिक सभांमध्ये अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. जीओचे ब्रॉडबँड कनेक्शन सुरु करण्याची घोषणा केली आहे. याशिवाय टेलिकॉम, रिटेल आणि तेलाच्या व्यवसायामध्येही मोठ्या योजनांची घोषणा केली आहे.

Live Update

ज्या ठिकाणी सर्वाधिक रजिस्ट्रेशन होईल तिथे गीगा फायबर सेवेला प्राधान्य देणार : मुकेश अंबानी

गीगा फायबरला देशातील सर्वात मोठ्या ५ ब्रॉडबँडमध्ये पोहचवण्याचे उद्दिष्ट : मुकेश अंबानी

गीगा फायबरचे रजिस्ट्रेशन १५ ऑगस्टपासून सुरु करणार : मुकेश अंबानी

जिओ सर्वात स्वस्त ब्रॉडबँण्ड बाजारात आणणार : मुकेश अंबानी

१५ ऑगस्टपासून जिओचा नवा फोन मिळणार : मुकेश अंबानी

रिलायन्सचे नवीन ॲप लॉन्च करणार : मुकेश अंबानी

नवीन ॲप इलेक्ट्रॉनिक उपकरणे हाताळणार : मुकेश अंबानी

रिलायन्सचा आणखी एक धमाका; आता येणार गीगा टीव्ही 

ग्राहक प्रत्येक दिवशी जिओचा सरासरी २१९ मिनिटे वापर करत आहेत : मुकेश अंबानी

प्रत्येक महिन्यात २४० कोटी डाटा वापरला जात आहे : मुकेश अंबानी

एकूण EBITDA मध्ये जिओची भागिदारी २ टक्क्यांहून १३ टक्के इतकी झाली : मुकेश अंबानी

गेल्या दोन वर्षांत जिओचे ग्राहक २२ कोटी झाले : मुकेश अंबानी

रिलायन्स खाजगी क्षेत्रातील सर्वात जास्त कर भरणारी कंपनी : मुकेश अंबानी

२०१८च्या अर्थिक वर्षात रिलायन्स उद्योग समुहाच्या नफ्यात वाढ : मुकेश अंबानी