Tue, Sep 25, 2018 14:35



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मंत्रालयासमोर कमरेला खराटा बांधून आंदोलन 

मंत्रालयासमोर कमरेला खराटा बांधून आंदोलन 

Published On: Jan 10 2018 1:58AM | Last Updated: Jan 10 2018 1:02AM

बुकमार्क करा




मुंबई : प्रतिनिधी

भीमा कोरेगाव येथील हिंसाचाराचा निषेध करत या घटनेतील दोषींना अटक करावी, तसेच या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा. या मागणीसाठी आरपीआयच्या खरात गटाकडून मंत्रालयाबाहेर अनोखे आंदोलन करण्यात आले. खरात गटाच्या सचिन खरात यांनी मंगळवारी गळ्यात गाडगे आणि कंबरेला खराटा बांधून मंत्रालयासमोर आंदोलन केले.

भीमा कोरेगाव घटनेचा निषेधार्थ सचिन खरात यांनी गळ्यात गाडगे आणि कंबरेला खराटा बांधून मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यास परवानगी देण्याची मागणी मंत्रालय सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीसांकडे मंगळवारी केली. मात्र पोलीसांनी परवानगी नाकारल्याने मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच ठिय्या देण्याचा प्रयत्न केल्याने पोलीसांनी खरात यांना ताब्यात घेतले.

पेशवाईमध्ये दलितांना थुंकण्यासाठी गळ्यात गाडगे आणि पाठीवर झाडू बांधण्याची सक्ती होती. सध्या राज्यात नव पेशवाई आली असून, शांततेच्या दिशेने मार्गक्रम करणार्‍या दलितांवर भीमा कोरेगावमध्ये हल्ला झाला. यासदर्भात संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्यावरही त्यांना अद्याप अटक करण्यात येत नाही. जातीय तेढ निर्माण करून दोन समाजात भांडणे लावण्याचा जो प्रयत्न सद्या सुरू आहे. त्याचा निषेध नोंदविण्यासाठी हे आंदोलन करत असल्याचे खरात यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.