Mon, Mar 25, 2019 05:14
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यभरातील मूकबधिर मुलांचे दादर येथे आंदोलन

राज्यभरातील मूकबधिर मुलांचे दादर येथे आंदोलन

Published On: Jul 23 2018 1:09AM | Last Updated: Jul 23 2018 12:54AMमुंबई : प्रतिनिधी

चेन्नईत अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराच्या निषेधार्थ दादच्या शिवाजी पार्क परिसरात मूकबधिर मुलांनी रविवारी आंदोलन केले. उर्वरित आरोपींना लवकरात लवकर फाशी देण्यात यावी, ही मागणी सर्व मूकबधिर मुलांच्या वतीने करण्यात आली. 

मंगळवारी सकाळी राज्याच्या विविध भागातून युनिटी ऑफ महाराष्ट्र डेफ असोसिएशनच्या माध्यमातून ही मुले एकत्र आली. ती राज्यभरातून दादर रेल्वे स्थानकात दाखल झाली. दादर स्थानकातून शिवाजी पार्कपर्यंत हातात फलक घेऊन मुलांनी मोर्चा काढला. शिवाजी पार्क परिसरात आंदोलन करण्यात आले. मिनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात आले. कर्णबधिर मुले आंदोलन करतानाही आपले म्हणणे मांडू शकली नाहीत.

चेन्नईत 16 जुलै रोजी बलात्कार झालेली अल्पवयीन मुलगी मूकबधिर होती. या मुलीला बलात्कार करणार्‍यांना विरोध करणेही किती अवघड झाले असेल?  तब्बल 22 जणांनी या मुलीवर अमानुषपणे बलात्कार करण्याचे निंदनीय कृत्य केले आहे. त्यातील 17 जणांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींना अटक करून या सर्वांना सार्वजनिक ठिकाणी फाशी देण्याची मागणी प्रदीप मोरे,राजेश कुलकर्णी करत आहेत.  मूकबधिर असणे ही आमची सर्वात मोठी कमकुवत बाजू आहे.

आम्हाला आमचे मत मांडण्यासाठीही इंटप्रिटरची गरज लागते. या मुलीवर बलात्कार करणारे नराधम गेली सात महिने बलात्कार करत होते. त्यामुळे या मुलीला आपल्या भावना व्यक्त करणेही किती अवघड झाले असेल, याचा विचार केला तरी मनाला त्रास होतो. पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींना अटक करावी. तसेच कोर्टाने आरोपींना फाशी देऊन या मुलीला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली.