Tue, Mar 19, 2019 10:02होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एसीपी निवडसूचीतील बहुतांश अधिकारी निवृत्तीच्या उंबरठ्यावर?

एसीपी निवडसूचीतील बहुतांश अधिकारी निवृत्तीच्या उंबरठ्यावर?

Published On: Sep 05 2018 7:44AM | Last Updated: Sep 05 2018 2:34AMनवी मुंबई : राजेंद्र पाटील 

पोलीस महासंचालकांनी 28 जून रोजी राज्य पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची सहायक पोलीस आयुक्त पदावर सेवा ज्येेष्ठेतेनुसार पदोन्नतीसाठी चारशे अधिकार्‍यांची निवडसूची तयार केली होती. मात्र या निवडसूचीतील केवळ 98 अधिकार्‍यांना राज्य सरकारने जूनअखेर एसीपी पदावर पदोन्न्ती दिली आहे.उर्वरित अधिकार्‍यांमधील काही अधिकारी चालू वर्षात सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. तर काही निवृत्तही झाले आहेत. तर समाजकल्याण विभागातील जात पडताळणी समिती दक्षता विभागाचा 11 एसीपींवर अतिरिक्त पदभार सोपविला आहे. 

दरवर्षी जानेवारी ते मार्च दरम्यान पोलीस महासंचालक कार्यालयाकडून सर्व पोलीस आयुक्त आणि अधीक्षक कार्यालयातंर्गत पदोन्नतीच्या यादीत येणार्‍या आणि सेवा ज्येेष्ठतेत बसणार्‍या पोलीस निरीक्षकांची यादी मागवली जाते.  यावेळी 28 जून रोजी तयार केलेल्या निवडसूचीत 400 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा समावेश करण्यात आला होता. 

मिळालेल्या माहितीनुसार 196 पदे सहायक पोलीस आयुक्त पदे रिक्त हाती. पोलीस महासंचालक कार्यालयाकडून संपूर्ण माहिती मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाला पाठवल्यानंतर त्यावर पुढील निर्णय घेतला जातो. आणि त्यानुसार 98 पोलीस निरीक्षकांना पदोन्नती जूनअखेरला देण्यात आली. आजमितीस 100 हून अधिक पदे सहायक पोलीस आयुक्तांची रिक्त असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने सांगितले. मात्र आता पदोन्न्तीचा विषय न्यायालयात असल्याने अधिक बोलणे उचित नसल्याचे ते म्हणाले. शिवाय राज्य सरकारने पोलीस दलात किती अधिकारी मराठा आहेत. याबाबत माहिती मागवली होती. यावरून आरक्षणाचा मुद्दा आता महत्त्वाचा ठरू लागल्याने त्यानुसारच आता पदोन्नती दिली जाणार असल्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे.