Thu, Jun 04, 2020 07:30होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'पाच हजारांहून अधिक जण हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये'

'पाच हजारांहून अधिक जण हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये'

Last Updated: Apr 01 2020 3:14PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. पाच हजारांहून अधिक लोक हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

मुंबईतील करोनाबाधितांची संख्या १६२ वर पोहोचली आहे. ५ हजारांहून अधिक जण 'हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मध्ये आहेत. अशा लोकांची संख्या ५३४३ एवढी आहे. या सर्वांना विलगीकरणात ठेऊन त्यांची चाचणी केली जाणार असल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी म्हटले आहे.

राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३२१ झाली आहे. मुंबईत कोरोनाचे अधिक रुग्ण आढळून येत असल्याने येथे धोका वाढला आहे. गेल्या बारा तासांत राज्यात एकूण १८ नव्या रूग्णांची वाढ झाली आहे. मुंबईत १६ नवे रूग्ण तर पुण्यात २ नव्या रूग्णांची चाचणी पॉझिटिव्ह आली. राज्यातील रुग्णांची संख्या तीनशे पार झाल्याने राज्यातील परिस्थिती आणखी गंभीर होत चालली आहे.

काल (दि.३१) राज्यातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ३०२ इतकी होती.  त्यात आता वाढ झाली आहे. मुंबईमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. शहरातील उच्चभ्रू इमारती आणि झोपडपट्टीमध्येही  झपाट्याने संसर्ग वाढत आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वेगाने वाढू लागली आहे.

दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन विभागाला आरोग्यमंत्री टोपे यांनी आज भेट दिली. कोरोनाशी सामना करण्याच्या दृष्टीने उभारलेल्या यंत्रणेचा त्यांनी आढावा घेतला. ही यंत्रणा सक्षमपणे काम करत असल्याचे टोपे यांनी म्हटले आहे.