Thu, Aug 22, 2019 03:50होमपेज › Mumbai-Thane-Raigad › खंडणीखोर मांगलेशी संबंधित डीवायएसपीचा जबाब नोंदवला

खंडणीखोर मांगलेशी संबंधित डीवायएसपीचा जबाब नोंदवला

Published On: Dec 12 2017 2:06AM | Last Updated: Dec 12 2017 1:45AM

बुकमार्क करा

ठाणे : प्रतिनिधी

राज्य रस्ते विकास महामंडळाचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि आयएएस अधिकारी राधेशाम मोपलवार त्यांच्याकडून दहा कोटीची खंडणी मागणार्‍या सतीश मांगले याचे अमरावती ग्रामीण पोलीस डीवायएसपी प्रवीण पाटील यांच्याशी जवळचे संबंध असल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. त्यानुसार ठाणे खंडणीविरोधी पथकाने पाटील यांची चार तास चौकशी करून जबाब नोंदवला. सतीश मांगले व मोपलवार यांची आपणच भेट घालवून दिली होती. मात्र, दोघांची भेट घालून देण्यापालिकडे आपला या प्रकरणात कुठलाही सहभाग नसल्याचे पाटील यांनी आपल्या जबाबात म्हटले आहे.

महाराष्ट्र शासनाचे सनदी अधिकारी राधेशाम मोपलवार यांची ऑडिओ क्लिप बनवून त्याद्वारे सतीश आणि श्रद्धा या मांगले दाम्पत्याने भ्रष्टाचाराचे आरोप लावले होते. मांगले यांनी ध्वनिफिती परत करण्यासाठी मोपलवर यांच्याकडे दहा कोटींची खंडणी मागितली. त्यानंतर 7 कोटी रुपयांची तडजोड करण्यात आली होती. दरम्यान मांगले दाम्पत्यांस एक कोटींची खंडणी घेतांना 31 ऑक्टोबर रोजी डोंबिवलीतील पलावासिटी येथून त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली होती. दरम्यान, मांगलेकडे श्रीलंकेचे एक सिमकार्ड आणि मोबाईलदेखील मिळून आले आहे. तर त्याच्या लॅपटॉपमध्ये दोन हजाराहून अधिक कॉल रेकॉर्डिंग आढळून आल्या आहेत.

या कॉल रेकॉर्डिंगची पडताळणी पोलिसांनी केली असता त्यात मांगले अमरावती ग्रामीण पोलीस दलाचे डीवायएसपी प्रवीण पाटील यांच्याशी वारंवार संपर्कात असल्याचे समोर आले होते. मांगले व पाटील यांच्या संबंधाची ठाणे खंडणी विरोधी पथकाने चौकशी सुरू केली आहे.