Tue, Apr 23, 2019 09:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मान्सून लवकरच कोकणात

मान्सून लवकरच कोकणात

Published On: May 26 2018 1:51AM | Last Updated: May 26 2018 1:43AMमुंबई : प्रतिनिधी

शुक्रवारी मान्सून अंदमानात दाखल झाला असून, पुढील तीन ते चार दिवसांत तो पूर्ण सक्रिय होऊन, संपूर्ण अंदमान-निकोबार बेटांवर पसरणार आहे. त्यानंतर 29 मेपर्यंत केरळात दाखल होऊन लवकरच कोकणमार्गे संपूर्ण महाराष्ट्रात प्रवेश करणार असल्याची आनंदवार्ता हवामान खात्याने दिली. 

1 जूनला केरळ, 5 जूनला कर्नाटक, आंध्रप्रदेश, 7 जूनला कोकण आणि तळकोकण, तर 10 जूनपर्यंत मुंबईकडे मान्सून सरकण्याची सरासरी तारीख असल्याचेही हवामान खात्याने सांगितले.गेल्या वर्षी 30 मे रोजी मान्सून केरळात दाखल झाला होता. यावर्षी मान्सून त्यापूर्वीच येणार आहे.