Sat, Nov 17, 2018 12:03होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मोनोरेल का पेटली?

मोनोरेल का पेटली?

Published On: Jan 21 2018 2:49AM | Last Updated: Jan 21 2018 1:14AMमुंबई : प्रतिनिधी

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने रिलायन्स सोबत मिळून मोनोरेल चरण 1 साठी 1100 कोटी खर्च करून मुंबईकरांना एक चांगली भेट दिली. मात्र 9 नोव्हेंबर रोजी पहाटे मोनोरेलच्या डब्याला आग लागण्याचे कारण अजूनही मोनोरेल प्रशासनाकडून मिळाले नसल्याची माहिती आरटीआयमधून समोर आली आहे.

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास  प्राधिकरणकडे मोनोरेलच्या डब्यात आगी लागण्याच्या कारणाविषयी विचारणी केली होती. शिवाय मोनोच्या दररोजच्या उत्पन्नाविषयीसुद्धा विचारणा केली होती. यावर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे शासकीय माहिती अधिकरी तथा कार्यकारी अभियंता(मोनोरेल) यांनी मोनोरेलच्या डब्याला आगी लागण्याच्या तपास अजून चालू आहे. तसेच मोनोरेलला अंदाजे दररोज 120000/- रुपयांचे उत्पन्न असल्याचे उत्तरात सांगितले. शिवाय आतापर्यंत मोनोरेलचे बंद काळात एकूण 85 लाख रुपये बुडाले असल्याचे सांगण्यात आले.