Sat, Nov 17, 2018 13:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › उद्यापासून पुन्हा मोनो!

उद्यापासून पुन्हा मोनो!

Published On: Aug 31 2018 2:09AM | Last Updated: Aug 31 2018 1:43AMमुंबई : प्रतिनिधी 

मोनोरेलच्या पहिल्या टप्प्यावर आगीच्या घटनेपासून बंद असलेली मोनो आता तब्बल नऊ महिन्यांनंतर सुरू होणार आहे. चेंबूर ते वडाळा या मार्गावर ही मोनो शनिवारपासून धावणार आहे. या टप्प्यावर मोनो दिवसभरामध्ये 130 फेर्‍या मारणार असल्याचेही मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) सांगण्यात आलेे.  

गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये मोनोरेलच्या पहिल्या टप्प्यावर आग लागल्याने मोनोरेल बंद पडली होती. ही मोनो अद्याप बंद आहे. मात्र आता तब्बल नऊ महिन्यांनंतर हा टप्पा सुरू होणार आहे. 1 सप्टेंबरपासून या टप्प्यावर मोनोरेल पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे प्राधिकरणाने गुरुवारी जाहीर केले. शनिवारी सकाळी सहा वाजता पहिली मोनोरेल वडाळा आणि चेंबूर या दोन्ही स्थानकांवरून सुटणार आहे. ही मोनो रात्री दहा वाजेपर्यंत  कार्यरत राहणार आहे. दर पंधरा मिनिटांनी सुटणार आहे.