Wed, Apr 24, 2019 15:33होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मोनो मेअखेरीस ट्रॅकवर!

मोनो मेअखेरीस ट्रॅकवर!

Published On: Apr 06 2018 2:13AM | Last Updated: Apr 06 2018 2:02AMमुंबई : प्रतिनिधी

देशातील पहिली मोनोरेल असा किताब मिळवणार्‍या मोनोरेलला आग लागल्या पासून मोनो रुळावर धावलीच नाही. मात्र तब्बल सहा महिने उलटून गेल्यानंतर मोनोरेल पुन्हा ट्रॅकवर परतणार आहे. मे अखेरीस ट्रकवर परतताना मोनोरेलचा वडाळा ते जेकब सर्कल असा दुसरा टप्पाही सुरू होत असल्याने प्रवाशांना चेंबूर ते जेकब सर्कल असा पूर्ण प्रवास करता येणार आहे.

दुसर्‍या टप्प्या सुरु होण्याच्या आतापर्यंत अंदाजे 11 डेडलाईन चुकल्या आहेत. मात्र मुंबईकरांची दुसर्‍या टप्प्याची मोनोची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. प्रवाशांना चेंबूर ते वडाळाच नव्हे, तर चेंबूर ते जेकब सर्कल असा थेट प्रवास मोनोने करता येणार आहे. चेंबूर ते जेकब सर्कल मोनो मार्ग सुरू करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून मे अखेरीस हा मार्ग सुरू होईल, अशी माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए)चे अतिरिक्त महानगर आयुक्त संजय खंदारे यांनी दिली आहे.

9 नोव्हेंबर 2017 रोजी पहाटे सव्वा पाचच्या सुमारास चेंबूर मोनो स्थानकातून वडाळा मोनो स्थानकाकडे निघालेल्या मोनोगाडीला अचानक आग लागली. यात मोनोचे दोन डबे जळून खाक झाले. त्या दिवसापासून चेंबूर-वडाळा मोनो मार्ग बंद आहे. त्याचवेळी 2011 मध्ये जो वडाळा ते चेंबूर मार्ग सुरू होणे अपेक्षित असताना तो मार्ग सुरु होण्यासाठी अखेर एप्रिल 2018 उजाडले तरी सेवेत दाखल झालेला नाही. एमएमआरडीएच्या नियोजनशून्य आणि संथ कारभारामुळे मोनो प्रकल्प रखडल्याचे म्हटले जात आहे.

tags : mumbai, mumbai news, Mono Rail, May, finally track,