Wed, Mar 27, 2019 04:00होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पैशांच्या वादातून महिलेवर चाकूहल्ला

पैशांच्या वादातून महिलेवर चाकूहल्ला

Published On: Jan 04 2018 1:49AM | Last Updated: Jan 04 2018 1:11AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

घराच्या बांधकामाचे पैसे देण्यास विलंब करत असल्याच्या रागातून एका माथेफिरूने 35 वर्षीय महिलेवर चाकूने वार केल्याची घटना मंगळवारी मानखुर्दमध्ये घडली. याप्रकरणी गंभीर दुखापतीचा गुन्हा दाखल करत मानखुर्द पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

मानखुर्दच्या साठेनगर परिसरातील अहिल्याबाई चाळीत मुमताज अहमद शेख (35) या कुटूंबासोबत राहतात. घराच्या बांधकामाच्या पैशांबाबत बोलायचे असल्याचे सांगून मंगळवारी दुपारी साडेचारच्या सुमारास मुमताज यांना घराशेजारील मैदानात बोलावले. बांधकामाचे थकलेले 15 हजार रुपये 10 तारखेला देते असे मुमताज यांनी सांगताच, दारुच्या नशेत असलेल्या आरोपीने त्यांच्यावर चाकू हल्ला करुन पळ काढला. मुमताज यांच्यावर हल्ला झाल्याचे लक्षात येताच मदतीसाठी धावलेल्या स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना देत, जखमी मुमताज यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मुमताज यांच्या तक्रारीवरून भादंवि कलम 326, 506 आणि 504 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.