Tue, Jul 23, 2019 01:55होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जोगेश्‍वरीत अश्‍लील वर्तन करून तरुणीचा विनयभंग

जोगेश्‍वरीत अश्‍लील वर्तन करून तरुणीचा विनयभंग

Published On: Jan 09 2018 2:02AM | Last Updated: Jan 09 2018 1:52AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

जिवे मारण्याची धमकी देत एका व्यक्तीने रस्त्यावरुन जाणार्‍या एका 26 वर्षीय तरुणीशी अश्‍लील वर्तन करुन तिचा विनयभंग केल्याची घटना रविवारी जोगेश्‍वरी परिसरात घडली. याप्रकरणी या तरुणीच्या तक्रारीवरुन ओशिवरा पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा नोंदवून समशेर शमीम अख्तर हैदर (38) या आरोपीस अटक केली आहे. मात्र हा गुन्हा जामिनपात्र असल्याने त्याची सात हजार रुपयांच्या जामिनावर सुटका करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. 

सदर तरुणी जोगेश्‍वरी परिसरात राहत असून त्याच परिसरातील एका खाजगी कंपनीत कामाला आहे. रविवारी सकाळी सव्वादहा वाजता ती पायी कामावर जात होती. यावेळी समशेरने तिचा पाठलाग करुन रस्त्यावरच तिच्याशी अश्‍लील वर्तन करण्याचा प्रयत्न केला, तिने विरोध करताच त्याने तिला शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. मात्र त्याकडे दुर्लक्ष करुन ती कामावर निघून गेली. दुपारी शमशेर हैदर तिच्या कामाच्या ठिकाणी आला आणि त्याने पुन्हा तिला शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी देण्यास सुरुवात केली. हा प्रकार एका कर्मचार्‍याने तक्रारदार तरुणीला सांगितला. शमशेरने तिथे अश्‍लील वर्तन करुन तिचा विनयभंगही केला. तसेच पुन्हा तिला जिवे मारण्याची धमकी देऊन शिवीगाळ करणयास सुरुवात केली. घडलेला प्रकार तिने तिच्या बहिणीला सांगून पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिथे उपस्थित पोलिसांना ही माहिती सांगून तिने शमशेर हैदरविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच रात्री उशिरा आरोपीस पोलिसांनी अटक केली.