Thu, Sep 20, 2018 14:59



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणे न्यायालय परिसरात महिलेचा विनयभंग

ठाणे न्यायालय परिसरात महिलेचा विनयभंग

Published On: Jan 11 2018 1:31AM | Last Updated: Jan 11 2018 12:47AM

बुकमार्क करा




ठाणे : प्रतिनिधी

नवी मुंबई येथील एका महिलेचा ठाणे न्यायालय परिसरात विनयभंग झाल्याप्रकरणी बुधवारी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात बलात्काराचा एका गुन्हा दाखल असून त्या गुन्ह्यातील आरोपीची पत्नी बुधवारी ठाणे न्यायालयात आली होती. त्याचवेळी त्या गुन्ह्यातील पीडित मुलीचे वडीलही न्यायालयात आले होते.

यावेळी आरोपीची पत्नी व त्या गुन्ह्यातील पीडित मुलीचे वडील यांची न्यायालयात दुपारी 4 च्या सुमारास वाद झाला. या वादात पीडित मुलीच्या वडिलांनी आरोपीच्या पत्नीला अश्लील शिवीगाळ करत विनयभंग केला. याप्रकरणी संबंधित महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याप्रकरणी तपास सुरू असून विनयभंग करणार्‍या आरोपीचे नाव सांगण्यास पोलिसांनी नकार दिला.