Sun, Jul 21, 2019 10:38होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिवसेनेच्या शाखेत महिलेचा विनयभंग

शिवसेनेच्या शाखेत महिलेचा विनयभंग

Published On: Jul 31 2018 1:37AM | Last Updated: Jul 31 2018 12:42AMमुंबई : प्रतिनिधी

शाखेतील कार्यकर्त्यांमध्ये असलेल्या गटबाजीतून वाद विकोपाला जाऊन एका कार्यकर्त्यांवर विनयभंगाचा गुन्हाच दाखल झाल्याची घटना कुर्ल्यातील नेहरुनगरात घडली आहे. एका महिला पदाधिकार्‍याच्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला असून नेहरुनगर पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.

कुर्ला पुर्वेकडील नेहरुनगर परिसरात शिवसेनेची 169 क्रमांकाची शाखा आहे. या शाखेमध्ये 24 तारखेला 39 वर्षीय महिला पदाधिकारी आली होती. ती आपल्याकडे बघून काही तरी बोलत असल्याचा राग मनात धरुन किसन जयसिंग (42) याने तिच्याविषयी अश्‍लिल शेरेबाजी करुन शिविगाळ करण्यास सुरुवात केली. हा वाद विकोपाला जाताच अन्य कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करुन वाद मिटविला. त्यानंतर तब्बल चार दिवसांनी या महिलेने नेहरुनगर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. या तक्रारीवरुन जयसिंग विरोधात विनयभंगाच्या 354 (अ)(1)(4), 509, 504 आणि 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.