Mon, Jun 24, 2019 20:57होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बदलापुरात वृद्धाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

बदलापुरात वृद्धाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Published On: Aug 10 2018 1:38AM | Last Updated: Aug 10 2018 1:13AMबदलापूर : वार्ताहर

बदलापूर पश्चिमेतील तुलसी विहार येथे राहणार्‍या एका 70 वर्षीय वृद्धाने 10 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विकृत मानसिकतेच्या या वृद्धाला पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. शामजीभाई पटेल असे या वृद्धाचे नाव आहे 

तुलसी विहार इमारतीतील एक 10 वर्षीय मुलगी शिकवणीवरून घरी परतत असताना या वृद्धाने मुलीला अश्‍लील स्पर्श केला. त्यानंतर तिचा पाठलाग करून त्याने लिफ्टमध्ये तिला गाठले. यावेळी नको ते प्रश्न विचारून तिचा विनयभंग केला. घरी पोहोचताच मुलीने याची माहिती पालकांना दिली. पालकांनी थेट पोलिसात याची तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ त्या वृद्धाला अटक केली. 

या वृद्धावर यापूर्वीही असाच एक गुन्हा दाखल असून त्या गुन्ह्यामुळेच या कुटुंबाने खारघर येथून बदलापुरात मुक्काम हलवला होता, अशी माहिती समोर आली आहे. या प्रकरणी विनयभंगासह लहान मुलांवरील लैंगिक अत्याचारास प्रतिबंध (पोस्को) कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण सारिपुत्र यांनी दिली आहे. त्याला उल्हासनगर येथील न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.