Thu, Apr 25, 2019 13:58होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मेलवरून अश्‍लील मॅसेज पाठवून आर्किटेक महिलेचा विनयभंग

मेलवरून अश्‍लील मॅसेज पाठवून आर्किटेक महिलेचा विनयभंग

Published On: Feb 11 2018 2:36AM | Last Updated: Feb 11 2018 1:46AMमुंबई : प्रतिनिधी

मेलवरुन अश्‍लील मॅसेज पाठवून एका 49 वर्षीय आर्किटेक महिलेच्या विनयभंगप्रकरणी आरोपीस मलबार हिल पोलिसांनी अटक केली आहे. अभिषेक विजयकुमार सिंग असे या 29 वर्षीय आरोपीचे नाव असून तो तक्रारदाराचा माजी कर्मचारी आहे. नोकरीवरुन काढून टाकल्याच्या रागातून त्याने हा मॅसेज पाठविल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. त्याच्याविरुद्ध भादंवि आणि आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तक्रारदार महिला आणि तिचा पती व्यवसायाने आर्किटेक म्हणून काम करीत असून त्यांचे दक्षिण मुंबईतील नरिमन पॉइर्ंट परिसरात एक खाजगी कार्यालय आहे. त्यांनी त्यांच्या वापरासाठी जीमेलमध्ये एक अकाऊंट उघडले होते. जून महिन्यात त्यांच्या मेलवर एक मॅसेज आला होता. अभिषेककुमार नावाच्या व्यक्तीने पाठवलेल्या या मॅसेजमध्ये अनेक आक्षेपार्ह आणि बदनामीकारक मजकूर देण्यात आले होते. त्यांच्या चारित्र्याविषयी आक्षेपार्ह मजकूर पाठवून या व्यक्तीने त्यांची बदनामी केली होती. त्यामुळे त्यांनी मलबार हिल पोलिसांत तक्रार केली. 

याप्रकरणी गुन्हा नोंद होताच मलबार हिल आणि सायबर सेल पोलिसांनी संयुक्तपणे तपास सुरु केला. तपासात हा मेल ऐरोलीवरुन आल्याचे उघडकीस आले. मात्र ही व्यक्ती तिथे राहत नसल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक माहितीवरुन जोगेश्‍वरी-विक्रोळी लिंक रोडवरील ग्रीनफिल्ड सोसायटीमध्ये अभिषेक सिंग या तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच हा मेल पाठविल्याचे उघडकीस आले. अभिषेक हा मूळचा बिहारचा रहिवाशी असून तो त्याच्या पत्नीसोबत सध्या विक्रोळीत राहतो. तो पूर्वी तक्रारदार महिलेकडे कामावर होता. मात्र काही कारणास्तव त्याला कामावरुन काढून टाकण्यात आले होते. त्याचा त्याच्या मनात राग होता. त्यातूनच त्याने त्यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह मॅसेज पाठवून त्यांची बदनामी करुन विनयभंग केला.