Sat, Jul 20, 2019 10:45होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लोकलमध्ये विनयभंग

लोकलमध्ये विनयभंग

Published On: Jun 18 2018 1:10AM | Last Updated: Jun 18 2018 1:04AMमुंबई : प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईतील तरुणींना धक्कादायक प्रसंगांना सामोरे जावे लागत असल्याच्या घटना समोर येत आहेत. सीएसएमटी स्थानकावर एका प्रवाशाने तपोवन एक्स्प्रेसमध्ये तरुणीला पाहत हस्तमैथून केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा वाशीत महिलांच्या डब्यात येऊन एका तरुणाने आपले सर्व कपडे काढल्याचा प्रकार पुढे आला आहे. त्यामुळे महिलांच्या आणि खास करून तरुणींच्या सुरक्षेबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणी वाशी पोलिसांनी उमाशंकर विजयशंकर दुबे (25) या माथेफिरूला अटक केली आहे.

तरुणीसमोर हस्तमैथून

नवी मुंबईच्या कोपरखैरणे येथील एका गावात राहणारी तक्रादार महिला 9 जून रोजी आपल्या 22 वर्षीय मुलीसह वाशी-ठाणे  लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यातून सकाळी 7.24 वाजता प्रवास करत होती. त्यांची लोकल घणसोली स्थानकावर आली असताना, आत शिरलेल्या या विकृताने पॅन्टची चेन काढून महिलेसमोर हस्तमैथून करू लागला. डब्यात दोघीच असल्याने त्यांनी खिडकीजवळ येऊन आरडाओरड केली. पुढील स्थानक आल्यानंतर दुबे पळून गेला. 

या प्रकरणी महिलेने वाशी पोलीस ठाण्यात माथेफिरूविरोधात तक्रार नोंदवली होती.त्यानुसार पोलिसांनी महिलेने दिलेले वर्णन आणि सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे तरुणाची ओळख पटवली. दुबे हा बेलापूरच्या सेक्टर-14 मधील दिवाळे गावचा राहणार असल्याचे समजले. वाशी पोलिसांनी त्याला शुक्रवारी रात्री सापळा रचून अटक केली.