Thu, Apr 25, 2019 13:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मोजोसचा युग पाठक पोलीस कोठडीत

मोजोसचा युग पाठक पोलीस कोठडीत

Published On: Jan 08 2018 1:27AM | Last Updated: Jan 08 2018 1:09AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

कमला मिल कंपाऊंडमधील वन अबव्ह आणि मोजोस बिस्रो पबला लागलेल्या आगीत शनिवारी अटक केलेल्या युग कौशल पाठक याला रविवारी भोईवाडा लोकल कोर्टाने 12 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. युग हा मोजोस बिस्रो पबचा मालक तसेच पुण्याचे पोलीस आयुक्त कौशल पाठक यांचा मुलगा आहे. 

या गुन्ह्यात सहमालक युग टुलीसह पबचा मॅनेजर आणि इतर कर्मचार्‍यांच्या अटकेसाठी पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे. गेल्या महिन्यातील 28 तारखेला वन अबव्ह आणि मोजोस बिस्रो या पबला भीषण आग लागून चौदा जणांचा मृत्यू झाला होता. तर तीसहून अधिक लोक जखमी झाले होते. मनपासह पोलिसांनी दिलेल्या सर्व अटींचे पालन केले आहे.  पोलिसांना चौकशीत युगने  सहकार्य केल्याने त्याला पोलीस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडी मिळावी, अशी विनंती युगच्यो वकिलांनी केली. मात्र, सरकारी वकिलांनी हा मुद्दा खोडून काढला. आगीचे मूळ कारण मोजोस बिस्रो पबच असल्याने त्याची चौकशी करायची असल्याचे सांगून पोलीस कोठडीची मागणी केली.