Sun, Mar 24, 2019 16:46होमपेज › Mumbai-Thane-Raigad › २०१९ ला पुन्हा मोदीच पंतप्रधान होतील : ज्योतिष सिद्धेश्‍वर मारकटकर

२०१९ ला पुन्हा मोदीच पंतप्रधान होतील : ज्योतिष सिद्धेश्‍वर मारकटकर

Published On: Aug 07 2018 1:41AM | Last Updated: Aug 07 2018 1:28AMठाणे : प्रतिनिधी 

आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या जागा कमी होतील, मित्रपक्षांच्या मदतीने भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेत येईल, पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील, असा होरा ज्योतिष सिद्धेेश्‍वर मारकटकर यांनी व्यक्त केला.  ठाण्यात प्रथमेश ज्योतिष संस्थेच्या तपपूर्तीनिमित्त ज्योतिषांच्या अधिवेशनाचे आयोजन ब्राह्मण सभा येथे करण्यात आले होते, त्यावेळी  ते बोलत होते. 

या परिषदेनंतर त्यांच्याशी संपर्क साधला असता, दैनिक पुढारीशी बोलतांना मारकटकर यांनी राज्याच्या सद्यस्थितीबाबत विविध विधानांचा अंदाज व्यक्त केला. शरद पवार यांचीही पंतप्रधान होण्याची इच्छा आहे, याबाबत विचारले असता ते म्हणाले, त्यांच्या पत्रिकेत तसे दिसत नाही आणि काँग्रेसची स्थितीही अनुकूल नाही, मात्र  त्यांच्या जागा वाढतील, मोदींच्या पत्रिकेत तसेच ग्रहमान आहे, असा दावा त्यांनी केला. मराठी आरक्षणाचा विषय ऑक्टोबरपर्यंत संपेल.

केंद्रात आगामी राज्यात भाजपाची सत्ता आली तर चंद्रकांत पाटील मुख्यमंत्री होतील आणि देवेंद्र फडणवीस हे केंद्रात जातील, अशी भविष्यवाणी त्यांनी वर्तविली. राज्यात विधानसभा निवडणूक लोकसभेसोबत झाली तर भाजपा राज्यात सत्तेत येईल, असा अंदाजही त्यांनी वर्तविला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होईल का? असा प्रश्‍न विचारला असता त्यांची पत्रिका चांगली आहे, त्यामुळे ते आपला कार्यकाळ पूर्ण करतीलच, शिवाय 2019 मध्ये ते केंद्रात जाऊ शकतात. ते केंद्रात गेल्यावर जर भाजपाची राज्यात सत्ता आली तर चंद्रकांत पाटील मुख्यमंत्री होतील, असाही होरा त्यांनी वर्तविला.