Mon, Aug 19, 2019 07:37होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मोडी लिपीचे प्रसारक श्री. ल. टिळक यांचे निधन

मोडी लिपीचे प्रसारक श्री. ल. टिळक यांचे निधन

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

ठाणे : प्रतिनिधी 

ज्येष्ठ लेखक आणि साहित्यरसिक श्री. ल. टिळक यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले, ते 85 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, 3 विवाहित मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. 

आयुष्याच्या उत्तरार्धात टिळक यांनी मोडी लिपीच्या प्रचारासाठी खूप मेहनत घेतली. त्यांनी लिहिलेले पंचकाल रुपलिपी आणि चित्पावन दर्शन हे दोन ग्रंथ खूप गाजले. मोडीच्या प्रसारासाठी त्यांनी लिहिलेल्या सहज सोपी मोडी लिपी या पुस्तकास वाचकांचा चांगला प्रतिसाद लाभला. 1964 मध्ये त्यांनी साहित्यस्नेही मंडळाची स्थापना केली. या मंडळाद्वारे त्यांनी वाचकांना ग्रंथवाचन आणि ग्रंथसंग्रहाची सुविधा उपलब्ध करून दिली. 40 वर्षे त्यांनी ग्रंथप्रसाराचे काम केले. व्यास क्रिएशन्स या संस्थेने प्रकाशित केलेल्या सहज सोपी मोडी लिपी या ग्रंथाच्या 5 आवृत्त्या प्रकाशित झाल्या. 

ज्येष्ठ लेखक जयवंत दळवी आणि वाड्.मय शोभाचे संपादक म. म. केळकर यांच्या प्रोत्साहनामुळे त्यांचे साहित्यजीवन फुलले. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या परळ शाखेच्या अभ्यास मंडळाचे तसेच ठाणे ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्यवाह म्हणून त्यांनी काम पाहिले होते.