Mon, May 20, 2019 22:38होमपेज › Mumbai-Thane-Raigad › हवा असेल तर साम, दाम,दंड, भेदचा अर्थ शिकवू : CM

हवा असेल तर साम, दाम,दंड, भेदचा अर्थ शिकवू : CM

Published On: May 27 2018 5:14PM | Last Updated: May 27 2018 5:39PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

गेली दोन दिवस महाराष्ट्राचे राजकारण मुख्यमंत्र्यांच्या ऑडिओ क्लिपने तापले आहे. पालघर पोटनिवडणुकीत शिवसेना आणि भाजपमध्ये रंगलेल्या 'ऑडिओ क्लिप'युद्धानंतर आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडायला सुरूवात झाली आहे. ‘मुख्यमंत्र्यांनी आम्हाला साम, दाम, दंड, भेद शिकवावे, असे आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्यावर ‘गरज असल्यास सर्व काही शिकवू’ असे प्रत्युत्तर मुख्यमंत्रओी देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. आज मुंबईतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शिवसेनेने व्हायरल केलेल्या क्लिपवर मुख्यमंत्री म्हणाले, ‘मी ती क्लिप निवडणूक आयोगाला दिली आहे. त्यांनी  ती तपासावी. आक्षेपार्ह्य असेल तर माझ्यावर कारवाई करावी. ज्यांनी त्यात छेडछाड केली त्यांच्यावरही कारवाई करावी. 

आज उद्धव ठाकरे यांनी दिलेले आव्हान मुख्यमंत्र्यांनी स्विकारले. ‘ज्यांना समजून घ्यायचे आहे त्यांना मी रोज समजवायला तयार आहे.हवा असेल तर साम दाम दंड भेदचा अर्थ शिकवतो, असेही मुख्यमंत्री म्हणाले. 

शिवसेनेच्या ऑडिओ क्लिपवर 'ऑडिओ क्लिप माझीच होती, पण त्यातील शेवटचे वाक्य त्यांनी दाखवले नाही. अन्यथा तोंडावर पडले असते,' असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यावर मुख्यमंत्र्यांनी साम-दाम-दंड-भेदचा अर्थ सांगावा. आम्ही त्यांच्याकडून मराठी शिकायलाही तयार आहोत, असं ठाकरे म्हणाले होते. 

मोदी सरकारला चार वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज भाजपकडून पत्रकार परिषेदेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये चार वर्षात केलेल्या कामाचा लेखा-जोखाच मुख्यमंत्र्यांनी वाचून दाखवला. १५ हजार ग्रामपंचायती इंटरनेटने जोडले. ३ कोटी ९८ लाख लोकांना गॅस कनेक्शन दिले.क्रेंद्राकडून राज्याला मोठा निधी मिळाला,असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. असल्याचेही ते म्हणाले. मी ८० टक्के विकासावर आणि २० टक्के राजकाराणावर बोलतो कारण आमच्याकडे सांगण्यासारखी अनेक कामे आहेत, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. 

मोदी सरकारला काल (२६ मे) चार वर्ष पूर्ण झाली. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. चार वर्षात केलेल्या कामांचा लेखा-जोखाच मुख्यमंत्र्यांनी आज जनतेसमोर मांडला.