Fri, Apr 26, 2019 01:22होमपेज › Mumbai-Thane-Raigad › इमारतीवरून उडी घेत मॉडेलची आत्महत्या

इमारतीवरून उडी घेत मॉडेलची आत्महत्या

Published On: Dec 12 2017 2:06AM | Last Updated: Dec 12 2017 1:27AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

मित्राच्या पार्टीला आलेल्या 25 वर्षीय मॉडेल तरुणीने इमारतीच्या पंधराव्या माळ्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी पहाटे मालाड, मालवणीमध्ये घडली. अर्पिता त्रिवेणीनाथ तिवारी असे मृत तरुणीचे नाव असून टीव्ही शोची ती अँकर असल्याची माहिती मिळते. या घटनेची नोंद करत मालवणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

मालाड पश्‍चिमेकडील मालवणी परिसरात असलेल्या कच्चा रोडवरील मानवतळ इमारतीमध्ये सोमवारी पहाटे साडेचार ते साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. आत्महत्या करणारी अर्पिता ही एका टीव्ही शोची अँकर असून रविवारी रात्री एका मित्राने इमारतीच्या पंधराव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये आयोजित केेलेल्या पार्टीसाठी ती आली होती. पार्टी आयोजित करणारा मित्र हा अर्पिताचा प्रियकर असल्याची माहिती मिळते. त्याच्यासोबत आणखी काही मित्र या पार्टीला उपस्थित होते. याठिकाणी झालेल्या वादानंतर अर्पिताने खिडकीतून खाली उडी घेतली.