होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मोबाईल, सौंदर्य प्रसाधने आजपासून महाग!

मोबाईल, सौंदर्य प्रसाधने आजपासून महाग!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

केंद्रीय अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आल्याप्रमाणे अनेक वस्तूंवरील आयात शुल्कात बदल करण्यात आले आहेत. तसेच दीर्घकालीन भांडवली फायद्यावर कर आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी उद्या 1 एप्रिलपासून करण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारपासून काही वस्तू चढ्या भावाने घ्याव्या लागणार आहेत. त्याशिवाय राष्ट्रीय महामार्गावरील प्रवासही रविवारपासून महागणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने टोलदरात पाच ते 7 टक्क्यांनी वाढ केली 
आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढण्याचीही शक्यता आहे.

स्वस्त

प्रक्रिया न केलेले काजू किंवा सालासकट काजू / वीट,टाईल्स
सोलार यंत्रणेत वापरण्यात येणारी सोलार टेम्पर्ड काच
साधे आणि ब्रँडेड पेट्रोल / साधे आणि ब्रँडेड डिझेल

महाग

फळांचे आणि भाज्यांचे विदेशी ज्यूस/ अत्तरे, मेकअपचे सामान / दाढीचं सामान / पतंग
स्कीन केअर औषधे / गाड्या ,गाड्यांचे सुटे भाग / चपला / हिरे आणि दागिने /मेणबत्त्या
पैलू न पाडलेले हिरे / मोबाईल फोन/ मोबाईल चार्जर / स्मार्ट वॉच/ रिफाईन्ड ऑईल
गॉगल्स/ डिओडरन्ट/खेळाचे साहित्य/ सिगारेट लायटर/ भिंतीवरची घड्याळं
एलसीडी, एलईडी,ओएलईडी टीव्ही/ गाद्या,उश्या/ व्हिडीओ गेम्स/ सुगंधित स्प्रे

Tags : mumbai news, Mobile, cosmetics expensive since today


  •