Sat, Feb 23, 2019 19:20होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मोबाईल नेटची भारताची ‘धीमी लोकल’

मोबाईल नेटची भारताची ‘धीमी लोकल’

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : वृत्तसंस्था

जागतिक पातळीवर मोबाईल डेटा वापरण्यात भारत आघाडीवर असला तरीही मोबाईल इंटरनेट डाऊनलोड स्पीडमध्ये मात्र खूपच पिछाडीवर आहे. यासंदर्भातील जागतिक क्रमवारीत भारताचा 109 वा क्रमांक लागतो. जगात सर्वाधिक मोबाईल इंटरनेट स्पीडमध्ये नॉर्वे आघाडीवर असून तेथील वेग 62.07 एमबीपीएस  (मेगा बाईट पर सेकंद) इतका प्रचंड आहे. भारतात हाच वेग 9.01 एमबीपीएस इतका कमी आहे.

विशेष म्हणजे भारतात 150 कोटी गिगाबाईट इतका प्रचंड डेटा वापरला जातो. अमेरिका आणि चीन एकत्रितपणे वापरत असलेल्या डेटापेक्षाही हा जास्त आहे. दुसरीकडे ब्रॉडबँड स्पीडच्या बाबतीत मात्र भारताची परिस्थिती  बरी असून फेब्रुवारीअखेरीस 67 व्या स्थानावर होता. गेल्या वर्षीपेक्षा भारताने 11 स्थानांनी प्रगती केली आहे. फेब्रुवारीमध्ये फिक्स्ड ब्रॉडबँड स्पीड 20.72 एमबीपीएस इतकी होती. या प्रकारात सिंगापूर जगात आघाडीवर असून तेथे ब्रॉडबँडचा वेग 161.53 एमबीपीएस इतका आहे.

ओकाला स्पीडेस्ट इंडेक्सच्या नव्या अहवालामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. दर महिन्याला जगातील इंटरनेट डेटा स्पीडचे परीक्षण केले जाते. भारतात सध्या स्पीड चाचणीसाठी त्यांचे 439 सर्व्हर आहेत.

Tags : Mobile, Internet Download, Speed, Slow, India, mumbai news


  •