Thu, Sep 20, 2018 09:00होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मिठी नदी प्रदूषित करणार्‍यांवर कारवाई

मिठी नदी प्रदूषित करणार्‍यांवर कारवाई

Published On: Jan 25 2018 1:48AM | Last Updated: Jan 25 2018 1:42AMमुंबई : प्रतिनिधी

सर्वोच्च न्यायालयाने मिठी नदी परिसरातील प्रदूषण पातळी कमी करण्यासंदर्भात आणि नदीचे संवर्धन करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार प्रदूषण कमी करण्यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी ठोस उपाययोजना कराव्यात. मिठी नदी प्रदूषित करण्यास कारणीभूत ठरणारी या परिसरातील गृह संकुले आणि खासगी कंपन्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे आदेश पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी बुधवारी दिले. 

मिठी, पोईसर व ओशिवरा नदीतील प्रदूषणाबाबत पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस अपर मुख्य सचिव सतीश गवई, पालिका आयुक्त अजोय मेहता, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे सदस्य सचिव डॉ. पी. अनबल्गन यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मिठी नदीपासून 18 मीटर परिसरात असलेल्या खासगी कंपन्यांना नियमाप्रमाणे बंद कराव्यात. तसेच, नदीमध्ये सोडले जाणारे सांडपाणी पूर्णत: बंद होण्याच्या दृष्टीने उपाययोजना आखून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी त्यांनी सांगितले.