Wed, Jul 24, 2019 12:06होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बेपत्ता एसीपी राजकुमार चाफेकर मध्यप्रदेशात 

बेपत्ता एसीपी राजकुमार चाफेकर मध्यप्रदेशात 

Published On: Apr 08 2018 10:31AM | Last Updated: Apr 08 2018 10:31AMनवी मुंबई : राजेंद्र पाटील 

नवी मुंबईतील एसीपी राजकुमार चाफेकर हे मध्यप्रदेशात असल्याचे समजते. गेल्या दोन दिवसांपासून ते बेपत्ता असल्याच्या बातमीने खळबळ उडाली होती. मात्र, चाफेकरांनी स्वत: फोन करुन आपण मध्यप्रदेशात असल्याचे सांगितले.

चाफेकर नवी मुंबईत एसीपी म्हणून कार्यरत आहेत. गेल्या २ दिवसांपासून ते संपर्कात नसल्याने बेपत्ता झाल्याचे म्हटले जात होते. या घटनेने वरिष्ठ पोलिस अधिकारीही चक्रावले होते. दरम्यान त्यांनी आपण मध्यप्रदेशात असल्याचे घरी फोन करुन सांगितले आहे. चाफेकर मुंबईला येण्यासाठी निघाले आहेत. ते येथे आल्यांनतरच मध्यप्रदेशात का गेले होते हे स्पष्ट होईल.

नवी मुंबई गुन्हे अन्वेषण विभागातील आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त राजकुमार चाफेकर गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होते. याप्रकरणी एनआरआय पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. 

सहायक पोलिस आयुक्त राजकुमार चाफेकर कुटुंब बेचैन झाले होते. एससीपी चाफेकर नियमित पोलिस आयुक्तालयातील गुन्हे विभागाच्या कार्यालयात कर्तव्यावर होते. त्यांच्याकडे आर्थिक गुन्हे विभाग देण्यात आला आहे. या आधी ते रायगड जिल्ह्यात पोलिस उपअधीक्षक पदावर माणगावला होते. त्यानंतर त्यांची बदली नवी मुंबईत झाली. एसीपी न्हावाशेवा विभागाचा पदभार सांभाळला होता. त्याचवेळी दोन दिवस त्यांना पनवेल एसीपी सुट्टीवर गेल्याने सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे प्रकरणाचा तपास केला होता. कंळबोली पोलिस ठाण्यात त्यांनी अभय कुरूंदकरसह इतर दोघांची चौकशी केली होती. गेल्या आठवड्यात त्यांच्या शाखा एकने सिडकोच्या भूखंड प्रकरणी बोगस कागदपत्रे तयार करून भूखंड गिंळकृत करणाऱ्या शिवसेनेच्या पदधिकाऱ्याला अटक केली होती. असे असताना अचानक बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली होती
 

Tags : Police, Missing, SP, Chafekar, madhyapradesh