Mon, Mar 25, 2019 09:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मिस वर्ल्ड मानुषी पालिका शाळेत

मिस वर्ल्ड मानुषी पालिका शाळेत

Published On: Dec 03 2017 1:43AM | Last Updated: Dec 03 2017 1:23AM

बुकमार्क करा

परळ/माटुंगा : वार्ताहर

मिस वर्ल्ड मानुषी छिल्‍लर हिने शनिवारी प्रभादेवीतील  पालिका शाळेला भेट देत विद्यार्थ्यांशी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. यावेळी सजवलेल्या डबलडेकर बसमधून बँड पथकाच्या सोबतीने वाजत-गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. मुंबईकरांनी मिस वर्ल्डला पाहण्यासाठी रस्त्यांवर मोठी गर्दी केली होती.

महानगरपालिकाच्या शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या विश्वसुंदरीची भेट आणि संवाद या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पालिकेच्या सर्व शाळांमधून विद्यार्थ्यांना अनुभवता आला. शिक्षणामुळे आत्मविश्वास निर्माण होतो. त्यामुळे शिक्षण आपल्या जीवनात महत्त्वाचे असल्याचे मत तिने व्यक्‍त केले. जागतिक विश्वसुंदरीच्या स्पर्धेत देशासाठी उतरताना आत्मविश्वास कामी आला,  असेही तिने  विद्यार्थ्यांना सांगितले.

यावेळी मुंबईचे महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर, उपमहापौर हेमांगी वरळीकर, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे  यांच्यासह विद्यार्थी-शिक्षकांची उपस्थिती होती.