Sat, Aug 17, 2019 17:11होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पोटच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पोटच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Published On: Mar 24 2018 1:51AM | Last Updated: Mar 24 2018 1:20AMउल्हासनगर : वार्ताहर 

नराधम बापाने पोटच्या 14 वर्षीय मुलीवर राहत्या घरात बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. या नराधमाने मुलीवर अत्याचार करण्यासाठी तिच्या भावाला कोंडून ठेवले. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून नराधमाला हिललाईन पोलिसांनी अटक केली आहे. उल्हासनगरातील हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा नराधम बाप पत्नी, दोन मुली व एक मुलगा यांच्यासह राहतो. गेल्या महिन्यात घरात कोणी नसल्याचा फायदा घेत त्याने मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केला.

मात्र पीडित मुलीने विरोध केला. त्यानंतर त्याने अनैतिक संबंध प्रस्थापित न केल्यास ठार मारण्याची धमकी देत तिला मारहाण केली. व तिचे तोंड दाबून तिच्यावर अत्याचार केला. पुन्हा पत्नी घरात नसताना मुलाला जबरीने बाथरूममध्ये कोंडून मुलीवर अत्याचार केला. सायंकाळी पीडित मुलीची आई घरी आल्यावर हा प्रकार त्या मुलीने  आईला सांगताच तिने जाब विचारला असता त्याने तिलाही शिवीगाळ करीत मारहाण केली.

परिसरात ही घटना पसरल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली होती. स्थानिक नागरिकांच्या मदतीने आईने मुलीला घेऊन हिललाईन  पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी तात्काळ या नराधम बापावर पोक्साअंंतर्गत गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. 
 

 

tags : Ulhasnagar,news,Minor girl raped