Tue, Nov 13, 2018 22:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मृत व्यक्तीच्या नावावर उंदीर मारण्याचे काम

मृत व्यक्तीच्या नावावर उंदीर मारण्याचे काम

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : विशेष प्रतिनिधी

विनायक मजूर सहकारी संस्थेचा चेअरमन मरण पावला असताना त्यांच्या नावावर मंत्रालयातील उंदीर मारण्याचे काम घेण्यात आल्याचा आरोप मंगळवारी विधानपरिषदेत विरोधी पक्षनेत्यांनी केला. या चेअरमचे कुटुंबिय आपल्याला भेटले असल्याचेही त्यांनी सांगितल्याने मंत्रालयातील मुषक पुरण नव्या वळणावर आले आहे.

भाजपचे विधानसभा सदस्य एकनाथ खडसे यांच्या अगोदर आपल्याकडे उंदीर घोटाळ्याची माहिती आली होती. पण त्याही अगोदर मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्याकडे माहिती अधिकार कार्यकर्त्याने कागदपत्रे पाठविली होती. पण त्यांनी हा घोटाळा दडविला, असा आरोपही विरोधी पक्षनेत्यांनी केला. विरोधी पक्षनेत्यांनी आपल्या भाषणातुन सरकारला चार प्रश्‍न विचारले. ते म्हणाले, 3 लाख 19 हजार 400 उंदीर मारले नसून तितक्या गोळ्या मंत्रालयामध्ये ठेवल्याचे सरकार सांगत आहे. मंत्रालयाचे क्षेत्रफळ पाहता यापैकी एकही गोळी कोणाच्या तरी पायाला जाणवली का, प्रत्येक मजल्यावर किती गोळ्या ठेवल्या होत्या, मजुर संस्थेचा चेअरमन मरण पावला असताना त्यांच्या नावावर कोणी काम घेतले व धनादेश कोणी वठविला. खडसे यांच्या आरोपानंतर सरकार सारवासारव करत असले तरी सर्वसामान्यांच्या मनात सरकारच्या कामाविषयी शंका निर्माण झाली आहे, असे विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सांगितले.


  •