Sun, Nov 18, 2018 07:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गिरणी कामगारांना आता वडाळ्यातही घरे

गिरणी कामगारांना आता वडाळ्यातही घरे

Published On: Jun 27 2018 2:12AM | Last Updated: Jun 27 2018 1:50AMमुंबई : प्रतिनिधी 

गिरणी कामगारांना मुंबईबाहेर घरे न देता मुंबईमध्येच घरे देण्यात यावीत अशी मागणी गिरणी कामगारांनी सरकारकडे केली होती. यावर म्हाडाने बाँबेडाईंग मिलवरील घरांमध्ये ज्यांना घरे पाहिजेत त्यांनी पनवेलमधील घराचा अधिकार सोडावा, असा पर्याय ठेवला आहे. यामुळे आता ज्या कामगारांना पनवेल येथील घर नको आहे त्या कामगारांनी वडाळा येथील घर पाहिजे असल्याचा अर्ज म्हाडाला दिला पाहिजे, अशी अट म्हाडाने घातली आहे. यामुळे गिरणी कामगारांचा मुंबईतील घरांचा मार्ग सुकर झाला आहे.

म्हाडाकडे घरासाठी अर्ज दाखल केलेल्यांपैकी ज्या गिरणी कामगारांना मुंबईबाहेर घरे नको आहे त्यांना म्हाडाने मुंबईतील वडाळा येथे घर देण्याचे मान्य केले आहे. यासाठी त्यांना म्हाडाकडे लेखी अर्ज करावा लागणार आहे.