Sat, Sep 22, 2018 08:58होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मिलिंद एकबोटे हायकोर्टात; जामिनावर उद्या सुनावणी?

मिलिंद एकबोटे हायकोर्टात; जामिनावर उद्या सुनावणी?

Published On: Jan 30 2018 2:17AM | Last Updated: Jan 30 2018 1:47AMमुंबई : प्रतिनिधी

कोरेगाव-भीमा दंगलीप्रकरणी अ‍ॅट्रोसिटी कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेल्या वादाच्या भोवर्‍यात अडकलेल्या समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी अटकपूर्व जामीनासाठी आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पुणे न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर एकबोटे यांनी दाखल केलेल्या अर्जावर 31 जानेवारी रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

या दंगल प्रकरणी एकबोटे शिक्रापूर पोलीस ठाण्यामध्ये अ‍ॅट्रासिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केल्याने पूणे विशेष न्यायालयाचे न्यायाधीश प्रल्हाद भगुरे यांनी अटकपूर्व जमीन अर्ज फेटाळला. त्यावेळी अ‍ॅट्रासीटी कायद्याअंतर्गत दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात अटकपूर्व जामिनाची तरतुद नसल्याने न्यायालयाने नमुद केले होते.

मात्र कोरेगाव भीमा दंगलीदरम्यान आपण प्रत्यक्ष तेथे उपस्थित नव्हतो. त्यामुळे आपल्यावर लावण्यात आलेले आरोप हे राजकीय सुडबुध्दीने आणि चुकीचे असल्याचा दावा एकबोटे यांनी आपल्या याचिकेत केला आहे.