Tue, Mar 26, 2019 20:16होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मिलींद एकबोटेंच्या याचिकेवर उद्या सुनावणी

मिलींद एकबोटेंच्या याचिकेवर उद्या सुनावणी

Published On: Feb 01 2018 2:15AM | Last Updated: Feb 01 2018 1:40AMमुंबई :

कोरेगाव-भीमा दंगलीप्रकरणी अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याने वादाच्या भोवर्‍यात अडकलेल्या समस्त हिंदू आघाडीचे कार्यध्यक्ष मिलिंद एकबोटे  यांच्या आव्हान याचिकेवर शुक्रवार 2 फेबु्रवारीला सुनावणी घेण्याचे उच्च न्यायालयाने निश्‍चित केले आहे. प्रारंभी न्यायामूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती बी. जी. कुलाबावाला यांच्या खंडपीठाने या याचिकेवर सुनावणी घेण्यास असमर्थता  दर्शविली. त्यानंतर तातडीने त्यावर सुनावणी घ्यावी म्हणून न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर ती सादर करण्यात आली. यावेळी न्यायालयाने शुक्रवारी सुनावणी घेण्याचे निश्‍चित केले.

जानेवारीला कोरेगाव-भीमा इथे शौर्यस्तंभाला वंदन करण्यासाठी जमलेल्या लोकांवर सणसवाडी इथे दीड ते दोन हजारांच्या जमावाने हल्ला केला त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या जमावाला मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे गुरुजी यांनी चिथावल्याचा आरोप ठेवून शिक्रापूर पोलीस ठाण्यामध्ये अ‍ॅट्रॉसिटी कायद्याअंतगर्ंत गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पुणे  विशेष न्यायालयाचे न्यायाधीश प्रल्हाद भगुरे यांनी मिलींद एकबोटे यांचा अटकपूर्व जमीन अर्ज फेटाळला.अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट कायद्याअंतर्गत  दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात अटकपूर्व जामिनाची तरतूद नसल्याने अर्ज फेटाऴत असल्याचे नमूद केले.

 न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात  एकबोटे यांनी उच्च न्यायालयात आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे.ज्या दिवशी ही घटना झाली त्यावेळेस आपण तिथे नव्हतो, तसेच या घटनेत आपला कोणताही सहभाग नसल्याने आपल्या विरोधात  लावण्यात आलेले आरोप हे  राजकीय सुडबुध्दीने आणि चुकीचे असल्याचा दावा याचिकेत केला आहे.