Thu, Jan 23, 2020 05:25होमपेज › Mumbai-Thane-Raigad › थर्टीफर्स्टच्या मध्यरात्री व्हॉट्सअ‍ॅप तासभर डाऊन  

थर्टीफर्स्टच्या मध्यरात्री व्हॉट्सअ‍ॅप तासभर डाऊन  

Published On: Jan 02 2018 1:50AM | Last Updated: Jan 02 2018 1:43AM

बुकमार्क करा
परळ ः प्रतिनिधी

जगातील सर्वात लोकप्रिय आणि आघाडीचे इन्स्टंट मेसेजिंग व्हॉट्सअ‍ॅप गुरुवारी रात्री बारा वाजताच्या दरम्यान काही काळासाठी डाऊन झाले होते. त्यामुळे कोट्यवधी युजर्सना काही काळ नववर्षाच्या शुभेच्छा पाठवताना अडचणी आल्या. तब्बल 60 मिनिटांनंतर व्हॉट्सअ‍ॅप पूर्ववत झाले. नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी रात्री जगभरातील युजर्स ऑनलाईन आले.  मात्र, ना मेसेजला उत्तर जात होते ना नवे मेसेज येत होते. 

अमेरिका आणि यूरोपमध्ये व्हॉट्सअ‍ॅप  जवळ-जवळ बंदच झाले होते. 49 टक्के युजर्सच्या मोबाईलवर व्हॉट्सअ‍ॅप इंटरनेटशी कनेक्ट होत नव्हते. यापैकी 28 टक्के युजर्सना मेसेज मिळत नव्हते. तर 22 टक्के युजर्सना लास्ट सीन  दिसणे बंद झाले होते. अनेकांनी इंटरनेट आणि वाय-फाय बंद करुन तसेच फोन रिस्टार्ट केले. त्यानंतर व्हॉट्सअ‍ॅपने तत्काळ काम करून सेवा पूर्ववत केली.