Wed, May 27, 2020 03:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मेवाणी, खालिदची भाषणे रोखली

मेवाणी, खालिदची भाषणे रोखली

Published On: Jan 05 2018 2:01AM | Last Updated: Jan 05 2018 2:27AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

भीमा कोरेगाव प्रकरणानंतर मुंबईसह महाराष्ट्रात झालेला हिंसाचार लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी मुंबतील छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या कार्यक्रमाला ऐनवेळी परवानगी नाकारली. दलित नेते जिग्नेश मेवाणी, दिल्ली विद्यापीठातील उमर खालिद यांना अटक करुन सोडण्यात आले. छात्रभारतीचेपदाधिकारी, विद्यार्थ्यांची पोलिसांकडून धरपकड सुरु होती. विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा सरकारकडून प्रयत्न सुरु असल्याचा आरोप या प्रकारानंतर विरोधकांनी केला आहे.

विलेपार्लेतील भाईदास सभागृहात गुरुवारी हा कार्यक्रम होणार होता. कार्यक्रम सुरू होण्याआधीच सभागृह परिसर आणि मुख्य प्रवेशद्वारावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी संमेलनासाठी आलेल्या 400 ते 500 विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन विविध पोलीस ठाण्यांत नेले. राज्यात दंगली घडवणारे आरोपी मोकाट असून नव्याने हुकूमशाहीचा उदय सरकार करत असल्याचा आरोप शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी केला.

भीमा कोरेगाव येथील क्रांती स्तंभाला 200 वर्षेे पूर्णहोत असल्याच्या निमित्ताने पुण्यात शनिवारवाड्यावर आयोजित करण्यात आलेल्या एल्गार परिषदेत गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवाणी, उमर खालिद यांचा सहभाग होता. 
त्यानंतर विलेपार्लेत कार्यक्रम आयोजित करण्यावर छात्रभारती संघटना ठाम होती. जिग्नेश मेवानी, उमर खालिद, अलाहाबाद येथील रिचा सिंग, हरियाणातील प्रदिप नरवाल या विद्यार्थी नेत्यांना सभागृहाच्या गेटवर अटक करून पोलीस ठाण्यात जेरबंद करण्यात आले. मेवानी, खालीद या दोघांना कोणत्या पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले याची माहिती दिली जात नव्हती.

राज्यभरातून आलेल्या विद्यार्थ्यांना जुहू पोलीस ठाण्यात आणले होते. दुपारी त्यांना सातांक्रुझ पोलीस ठाण्यात हलवण्यात आले. सरकार हमसे डरती है! पोलीस को आगे करती है, कोण म्हणत देणार नाय, घेतल्याशिवाय राहणार नाय! अशा घोषणा संतप्त विद्यार्थ्यांनी पोलीस आणि राज्य सरकारचा निषेध केला. पोलीस दडपशाही करून संमेलन बंद पाडत असल्याचा आरोप जेएनयू विद्यापीठातील विद्यार्थी नेता प्रदिप नरवाल यांनी केला. तर रिचा सिंग यांनीही झालेल्या प्रकाराबाबत सरकारला किंमत मोजावी लागेल, असा इशारा दिला.

भीमा कोरेगाव येथील क्रांती स्तंभाला 200 वर्षेे पूर्णहोत असल्याच्या निमित्ताने पुण्यात शनिवारवाड्यावर आयोजित करण्यात आलेल्या एल्गार परिषदेत गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवाणी, उमर खालिद यांचा सहभाग होता.