Fri, Apr 19, 2019 12:44होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मेट्रो दिवा-डोंबिवली-कल्याणपर्यंत आणा

मेट्रो दिवा-डोंबिवली-कल्याणपर्यंत आणा

Published On: Dec 21 2017 2:10AM | Last Updated: Dec 21 2017 1:39AM

बुकमार्क करा

डोंबिवली : वार्ताहर

एमएमआरडीए व सिडकोच्या माध्यमातून रायगड-ठाणे जिल्ह्यात मेट्रो रेल्वेचा प्रकल्प सध्या सुरू आहे. या प्रकल्पाचा फायदा सर्वंकश व्हावा. तळोज्यापर्यंत आलेली मेट्रो रेल्वे दहिसर मोरी, कल्याण फाटामार्गे दिवा, डोंबिवली ते कल्याणपर्यंत सुरू करावी, अशी मागणी औचित्याच्या मुद्द्याद्वारे आमदार सुभाष भोईर यांनी बुधवारी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात केली. 

तळोजा ते कल्याण फाटा दिवा, डोंबिवली-कल्याण मेट्रो रेल्वे मार्गाचे सर्र्वेेक्षण देखील झाले आहे. तळोजा एमआयडीसीमध्ये मोठमोठे कारखाने आहेत. डोंबिवली व कल्याण ग्रामीण परिसरातून रोजंदारीकरिता तसेच शाळा, कॉलेजकरिता येणारा विद्यार्थीवर्ग येथे मोठ्या प्रमाणात प्रवास करीत असतो. तळोजा ते कल्याण फाटामार्गे डोंबिवली, कल्याण जंक्शनपर्यंत मेट्रोची रेल्वेसेवा सुरू झाल्यास शहरे एकमेकांना जोडली जातील. त्यामुळे या पट्ट्यातील जनतेचा सर्वांगीण विकासदेखील होईल. या पार्श्वभूमीवर आमदार भोईर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सदर मेट्रो रेल्वे सुरू करण्याची मागणी केली. 

यावेळी सभागृहाच्या पायर्‍यांवर सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी आंदोलन केले. आ. सुभाष भोईर यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या आंदोलनाला आ. प्रताप सरनाईक, आ. सुनील राऊत, आ. रमेश लटके, आ. गणपतराव गायकवाड, आ. रवींद्र फाटक, आ. प्रकाश सुर्वे, आ. राजन साळवी, आ. वैभव नाईक यांनी पाठिंबा दिला.