Wed, Nov 14, 2018 12:51होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मेट्रो मार्गिकांलगतच्या दहा ठिकाणांना मिळणार वाढीव एफएसआय

मेट्रो मार्गिकांलगतच्या दहा ठिकाणांना मिळणार वाढीव एफएसआय

Published On: Apr 30 2018 2:00AM | Last Updated: Apr 30 2018 1:54AMमुंबई : प्रतिनिधी 

मुंबईतील मेट्रो मार्गिका ज्याठिकाणी एकमेकांना छेदतील अशा  दहा  ठिकाणांना वाढीव एफएसआय देण्यात येणार आहे. तशी तरतूद विकास आराखड्यात करण्यात आली आहे. यामुळे अंधेरी ते दहिसरदरम्यानच्या रहिवाशांना त्याचा लाभ मिळणार आहे. 

मुंबईमध्ये सध्या वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर हा मेट्रो-1 कार्यान्वित आहे. तसेच कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो 3, मानखुर्द-डीएन नगर मेट्रो-2, वडाळा ते कासारवडवली मेट्रो-4, अंधेरी ते दहिसर मेट्रो-7 या मार्गांचे काम वेगाने सुरू आहे. या मार्गिकांमुळे भविष्यात मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीला गती येणार आहे. परंतु या मेट्रो मार्गिका ज्या ठिकाणी छेदणार आहेत किंवा तेथे इंटरचेंजची सुविधा असणार आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि जलदगतीने होणार आहे. 

परंतु याठिकाणी सुविधा उपलब्ध करताना तेथील स्थानिकांकडून कोणत्याही प्रकारचे अडथळे निर्माण होऊ नयेत यासाठी विकास नियंत्रक नियमावलीनुसार मेट्रो स्थानकापासूनच्या पाचशे मीटर परिसरातील रहिवाशांना विशेष एफएसआय देण्याचे जाहीर करण्यात आले आहे.

Tags : Mumbai, mumbai news, Metro Gangway issue,