Sun, May 31, 2020 00:38होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मेट्रो-1 सेवा सुरू होणार

मेट्रो-1 सेवा सुरू होणार

Last Updated: May 24 2020 1:19AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

मुंबई उपनगरीय रेल्वेच्या मध्य आणि पश्चिम रेखा जोडणारी मेट्रो लॉकडाऊननंतर मुंबईकरांच्या सेवेसाठी सज्ज होणार आहे. मेट्रोकडून सध्या बैठक व्यवस्था सुधारित करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून ही वाहतूक व्यवस्था सुरू करण्यात येणार आहे. प्रवासादरम्यान दोन प्रवाशांमध्येसुरक्षित अंतर राहण्यासाठी एक आड एक आसन अशी बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याकरिता स्टिकर लावण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे कोणत्या सीटवर बसायचे आणि कोणती सीट रिकामी ठेवायची याची माहिती प्रवाशांनामिळणार आहे.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशभरात 22 मार्चपासून टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. तेव्हापासून मुंबई मेट्रो सेवा प्रवासी वाहतुकीसाठी पूर्णपणेबंद आहे. या मार्गावर 12 स्थानके असून रोजच्या 400 फेर्‍यात सुमारेसाडेचार लाख प्रवासी प्रवास करतात. लॉकडाऊन उठल्यानंतर ही सेवा नव्या नियमांसह प्रवाशांसाठी खुली होणार आहे. दोन प्रवाशांमधील अंतर, त्यांची तपासणी आणि गर्दी नियंत्रण सारख्या उपाययोजना करतच ही सेवा सुरू करण्यात येणार आहे.