Mon, Feb 18, 2019 19:48होमपेज › Mumbai-Thane-Raigad › व्यापाऱ्यांचा ‘एपीएमसी’वर धडक मोर्चा

व्यापाऱ्यांचा ‘एपीएमसी’वर धडक मोर्चा

Published On: Jan 08 2018 3:59PM | Last Updated: Jan 08 2018 3:59PM

बुकमार्क करा
नवी मुंबई: राजेंद्र पाटील 

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने नोटीसा बजावून एक रूपया सेवा शुल्क वसुलीची कारवाई सुरू केल्याने संतापलेल्या व्यापाऱ्यांनी एपीएमसीवर सोमवारी दुपारी साडेतीन वाजता धडक मोर्चा काढून आंदोलन केले. या मोर्चात मसाला व दाणा बंदरमधील व्यापारी सामील झाले होते. 

व्यापाऱ्यांनी यावेळी सेवा शुल्क रद्द करण्याची मागणी लावून धरली. तसेच गुलाब पुष्प देवून  व्यापाऱ्यांना सेवा शुल्क मुक्त व्यापार करू द्या अशी मागणी सचिव व प्रशासकांकडे केली. मात्र, राज्य सरकारनेच याबाबत वसुलीचे आदेश दिले होते. शिवाय नुकत्याच झालेल्या अधिवेशनात याबाबत जोरदार चर्चा विधानसभेत झाली. त्यावेळी पणन व सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी एपीएमसीने नियुक्त केलेल्या दोन अधिकाऱ्यांच्या समितीने दिलेल्या अहवालानुसार कार्यवाही केली जाईल असे स्पष्ट केले होते. 

त्यानुसार प्रशासक सतीश सोनी यांनी तातडीने उपसचिवांनी मसाला व दाणाबंदरमधील व्यापाऱ्यांना नोटीसा बजावल्या. दोन वर्षांपासून थकलेला सेवा शुल्क भरणा करावा असे सांगितले. मसाला मार्केट मध्ये व्यापाऱ्यांच्या 14 संघटना आहेत. तर दाणाबंदर मध्ये दोन संघटना आहेत. यावेळी किर्ती राणा, मयुर सोनी उपस्थित होते.