Wed, Jan 23, 2019 12:42होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रविवारी तीनही मार्गांवर मेगाब्लॉक 

रविवारी तीनही मार्गांवर मेगाब्लॉक 

Published On: May 05 2018 1:22AM | Last Updated: May 05 2018 1:02AMमुंबई : प्रतिनिधी 

पश्‍चिम व मध्य रेल्वेने रविवार 6 मे रोजी मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ब्लॉकच्या काळात काही लोकल रद्द करण्यात येणार असल्यामुळे लोकलसेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांनी दरवाजावर उभे राहून प्रवास करू नये, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. 

मध्य, हार्बर (मेन मार्ग)  

कल्याण ते दिवा अप जलद मार्गवेळ : स. 11.15 ते दु. 4.15 वाजेपर्यंतकल्याणहून सुटणार्‍या जलद लोकल स. 10.54 ते दु. 4.19 पर्यंत अप धीम्या मार्गावर चालवण्यात येणार आहे.  सर्व जलद लोकल कल्याण ते ठाणे स्थानकापर्यंत धीम्या मार्गावर चालतील. त्यानंतर या लोकल पुन्हा ठाणे ते सीएसएमटीपर्यंत जलद मार्गावर चालतील.  लोकलना मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा स्थानकावर थांबा सीएसएमटीहून सुटणार्‍या जलद लोकल स. 10.16 ते दु. 3.22 पर्यंत घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, दिवा स्थानकात थांबतील. लोकल 15 मिनिटे उशीराने धावतील.  मेल-एक्स्प्रेस सुमारे 30 मिनिटे उशीराने धावतील. 

हार्बर मार्ग

सीएसएमटी ते चुनाभट्टी व सीएसएमटी ते वांद्रे मार्ग  वेळ : स. 11.10 ते दु. 4.40 वाजेपर्यंत सीएसएमटी ते वाशी, बेलापूर, पनवेल मार्गावर धावणार्‍या लोकल स. 11.34 ते दु. 4.47 पर्यंत आणि सीएसएमटी ते वांद्रे, अंधेरी, गोरेगाव मार्गावर धावणार्‍या लोकल स. 9.56 ते दु. 4.43 पर्यंत धावणार नाहीत. 

पश्चिम रेल्वे

चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानक  वेळ : स. 10.35 ते दु. 3.35 पर्यंत या कालावधीतसर्व धीम्या लोकल या जलद मार्गावर चालवल्या जातील. काही लोकल रद्द होणार   

Tags : Mumbai, Mega blocks, all, three, routes, Sunday