Wed, Mar 20, 2019 08:31होमपेज › Mumbai-Thane-Raigad › तिन्ही रेल्वे मार्गांवर उद्या मेगाब्लॉक

तिन्ही रेल्वे मार्गांवर उद्या मेगाब्लॉक

Published On: Apr 21 2018 1:19AM | Last Updated: Apr 21 2018 1:02AMमुंबई : प्रतिनिधी 

मध्य रेल्वेने मेन मार्गावर मुलड ते माटुंगा अप धिम्यागतीच्या मार्गासह हार्बर मार्गावर व पश्‍चिम रेल्वेने बोरिवली ते गोरेगाव स्टेशन दरम्यान रविवार 22 एप्रिलला मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या मार्गावरील काही उपनगरीय गाड्या रद्द करण्यात येणार असल्यामुळे गाड्यांना गर्दी होण्याची शक्यता आहे. 

मध्य रेल्वे (मेन मार्ग) 

 •  मुलुंड ते माटुंगा धिमागती मार्ग 
 •  सकाळी 11 ते सायं. 4.10 वा. 
 •  कल्याणहून निघणार्‍या सर्व धिम्या लोकल स. 10.37 ते दु. 4.02 पर्यंत मुलुंड ते माटुंगा स्टेशन दरम्यान जलदगतीच्या मार्गावर वळवण्यात येतील. 
 •  लोकलला मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, सायन स्टेशनवर थांबा 
 •  सीएसएमटीहून सुटणार्‍या जलद आणि सेमी जलद लोकल स. 10.16 ते दु. 2.54 पर्यंत लोकल घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, दिवा स्टेशनवर थांबणार 
 •  कल्याणहून सुटणार्‍या जलद आणि सेमी जलद लोकल स. 10.04 ते दु. 3.06 पर्यंत दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला स्टेशनवर थांबतील.
 •  सीएसएमटीच्या दिशेने ये-जा करणार्‍या लोकल स. 11 ते सायं. 6 पर्यंत किमान 10 मिनिटे उशीराने धावतील. 

पश्चिम रेल्वे

 • बोरिवली ते गोरेगाव अप आणि डाऊन जलद गती मार्ग 
 • स. 10.35 ते दु. 3.35 पर्यंत 
 • या कालावधीत सर्व धिम्या लोकल जलद मार्गावर चालतील. 
 • ब्लॉक कालावधीत बोरिवलीतील 1,2,3,4 क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर लोकल थांबणार व सुटणार नाही. 
 • राम मंदिर स्थानकातही लोकल थांबणार नसून काही फेर्‍या रद्द होणार आहेत.

हार्बर मार्ग

 •  कुर्ला ते वाशीपर्यंत अप आणि डाऊन
 •  स. 11.10 ते. दु. 4.10 पर्यंत 
 •  सीएसएमटीहून पनवेल-बेलापूर-वाशीसाठी सुटणार्‍या लोकल स. 10.34 ते दु. 3.39 आणि पनवेल-बेलापूर-वाशीहून सीएसएमटीच्या दिशेने सुटणार्‍या लोकल स. 10.21 ते दु. 3.41 पर्यंत खंडीत राहतील. 
 •  प्रवाशांच्या सुविधेसाठी सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेलपर्यंत विशेष फेर्‍या चालवल्या जातील. 

Tags : Mumbai, Mega Blocks, three railway, routes, tomorrow, Mumbai news,